'त्या' नगरसेवकाला कठोर शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:24+5:302021-08-28T04:29:24+5:30
रस्त्यावर उतरण्याचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : निपाणी येथील आंबा मार्केटमध्ये नगरसेवकांसह अन्य चार जणांनी शेतकऱ्यावर जो जीवघेणा ...
रस्त्यावर उतरण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी :
निपाणी येथील आंबा मार्केटमध्ये नगरसेवकांसह अन्य चार जणांनी शेतकऱ्यावर जो जीवघेणा हल्ला केला असून या घटनेतील काही आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी. आंबा मार्केटमधील व्यापाऱ्यांची मक्तेदारी थोपविण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत अन्यथा शेतकरी व श्रीराम सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा निपाणी परिसरातील शेतकरी व श्री राम सेनेने दिला आहे.
बुधवारी बुधलमुख तेथील शेतकरी सुशांत कडाकणे व आबासाहेब कडाकणे यांच्यावर आंबा मार्केटमध्ये नगरसेवकांसह काही साथीदारांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर या घटनेचे परिसरात तीव्र पडसाद उमटले आहेत. शुक्रवारी श्रीराम सेना व शेतकऱ्यांनी निवेदने देऊन याचा निषेध केला.
निवेदनात असे म्हटले आहे की, या घटनेतील मोकाट आरोपींना तत्काळ अटक करावे. बाजारपेठ सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निवेदनात म्हटले आहे. तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत लवकरच कार्यवाही करू असे आश्वासन दिले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एन.आय खोत, प्रसन्नकुमार गुजर, प्रा. मधुकर पाटील, जयराम मिरजकर, विठ्ठल वाघमोडे, महेश पाटील, नारायण पठाडे, रमेश भोईटे, शकुंतला तेली, अनिल खवरे, अनिल रामनकट्टी, संदेश बुदिहाळे, सुबराव खोत, बाबुराव माने, शुभम डाफळे, संभाजी कडाकणे, सागर पवार, अमित खोत, भुजंग ढेरे, ज्योतिबा चव्हाण, जनार्दन भाटले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
श्री राम सेनेचेही निवेदन
श्री राम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई करावी व फरार असलेल्या अन्य चौघांना ४८ तासात अटक करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देत निवेदन दिले. काही ठरावीक लोकांमुळे समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे, तरी याला आवर घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
फोटो
निपाणी : शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या नगरसेवकाला कठोर शिक्षा द्यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.