ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीला जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:27+5:302021-06-04T04:18:27+5:30

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली असून या दफनभूमीच्या जागेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा, ...

Give space to the cemetery of the Christian community | ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीला जागा द्या

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीला जागा द्या

googlenewsNext

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली असून या दफनभूमीच्या जागेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह महापालिका प्रशासनास केली.

यासंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका आयुक्त कार्यालय येथे गुरुवारी बैठक पार पडली. ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी अशी अनेक वर्षांची ख्रिश्चन समाज आणि संघटनांची मागणी आहे. याकरिता आंदोलनेही झाली आहेत, याकडे क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.

शहरातील ख्रिश्चन समाज दफनभूमी करिता ब्रम्हपुरी, जुना बुधवार पेठ येथे सुमारे २० गुंठे जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. परंतु, आजतागायत जागेचा प्रश्न सुटलेला नाही. ही जागा पिरजादे कुटुंबीयांच्या नावे असून त्यांना या जागेच्या बदल्यात टी. डी. आर. देवून जागा हस्तांतरित करणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला असल्याचे क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त विनायक औंधकर, आरोग्य अधिकारी अशोक पोळ, उपशहर अभियंता नारायण भोसले आदी उपस्थित होते.

प्रक्रिया लवकरच पूर्ण

ख्रिश्चन समाजास दफनभूमीस जागा देण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून, याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून देत असल्याचे प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

फोटो क्रमांक - ०३०६२०२१-कोल- राजेश क्षीरसागर

ओळ - कोल्हापुरातील ख्रिश्चन समाजाला द्यायच्या दफनभूमीच्या जागेबाबत गुरुवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली, यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Give space to the cemetery of the Christian community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.