शाहू जन्मस्थळास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या, आमदार जाधव,पाटील यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 07:18 PM2020-07-03T19:18:07+5:302020-07-03T19:19:49+5:30
कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करून राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.
कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करून राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असणारे लक्ष्मी विलास पॅलेस प्रेरणास्थळ आहे. शाहू महाराजांचे जन्मस्थळ नव्या पिढीला समता, लोकशाही, आधुनिकता आणि विकास यांची सतत प्रेरणा देणारे आहे. या रयतेच्या राजाचा इतिहास, कर्तृत्व, कार्य आणि विचार लोकांसमोर येण्यासाठी जन्मस्थळाच्या विकासाचे काम प्रगतिपथावर आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी व त्यांच्या विचारांचा जागर देशभर करण्यासाठी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी मंत्रिमंडळाची तत्काळ मंजुरी द्यावी आणि राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.