विद्यार्थ्यांना शिकवणी फीमध्ये सवलत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:07+5:302021-08-13T04:28:07+5:30
शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ३० जून २०२१ या परिपत्रकामध्ये ठरावीक बाबींमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तो स्वागतार्ह ...
शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ३० जून २०२१ या परिपत्रकामध्ये ठरावीक बाबींमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तो स्वागतार्ह असला तरी कोरोना, महापूर यासारख्या कठीण प्रसंगामध्ये पालक आर्थिक विवंचनेत असल्याने विद्यार्थ्यांची अडचणी लक्षात घेता शिकवणी फी भरता येत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिकवणी फीमध्ये सवलत मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. त्यामुळे शिक्षण विभागाने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिक्षण सहसंचालक हेमंत कटरे यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सौरभ शेट्टी, तेजस कुलकर्णी, अक्षय खोत, हेमंत देसाई, आण्णा सुतार, प्रथमेश पाटील, वैभव चौगुले आदी उपस्थित होते.
फोटो - १२०८२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - कोल्हापूर येथे शिक्षण सहसंचालक हेमंत कटरे यांना स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्यावतीने निवेदन देण्यात आले.