दिवाळीला साखर द्या, अन्यथा टाळे ठोक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:46 PM2017-09-19T16:46:45+5:302017-09-19T16:51:03+5:30
कोल्हापूर : दारिद्रय रेषेखालील रेशन कार्डवरील साखर बंद केल्याच्या निषेधार्थ राष्टÑीय काँग्रेसच्यावतीने संजय पाटील यांनी शिष्ठमंडळासोेबत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पुरवठा विभागाला मिठाची मिठाई भेट देऊन अभिनव पध्दतीने आंदोलन केले.
गोरगरिबांच्या तोंडची साखर हिरावून घेऊ नका असे सांगत ही कार्डधारकांची साखर सुरु न झाल्यास पुरवठा विभागाला टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशाराही दिला. याबाबतचे निवेदन महिलांच्या शिष्ठमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवाणे यांना दिले.
राज्यातील सुमारे २५ लाख दारिद््ररेषेखालील कुटूंबांची यंदाची दिवाळी गोड होणार नाही. बीपीएल कुटूंबांची साखर बंद करुन गरीबांना चहा पिणेही अवघड केले आहे. अंत्योदय कुटूंबांनाही ५ रुपय किलोने मिळणारी साखर २० रुपये वाढ केली आहे. राज्य सरकारने केंद्राचा निर्णय म्हणून हात झटकले आहेत.
राज्य सरकारने तिजोरीतून काही निधी खर्चून राज्यातील ४५ हजार बीपीएल धारकाना साखर उपलब्ध करुन द्यावी. केंद्राने इंधन दरवाढीतून लुटलेला पैसा गरीबांसाठी साखर खरेदीवर वापरावा असे सांगून रेशनव्यवस्था संपविण्याचे षडयंत्र सरकार रचत असल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला. दिवाळीसाठी साखर उपलब्ध करुन न दिल्यास पुरवठा विभागाला टाळे ठेोकण्याचा इशारा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांना दिलेल्या निवेदनातून केला.
या आंदोलनात अमिना मुजावर, बेबी थोरात, बीबीजान फरझान, गुजराबाई शितळे, सुंदराबाई शिंदे, कल्पना दगडे, लक्ष्मी सुतार, कृष्णाबाई कदम, रुपाली भोसे, कमल दगडे, सविता मंडल, लक्ष्मी आवटे, यास्मिन कांबळे, मदिना सय्यद, मिताली मुलीममी, प्रशांत गवळी, रोमा भोरे, अनुसया बेनोदे आदींचा सहभाग होता.
दारिद्ररेषेखालील रेशनकार्डधारकांची साखर शासनाने बंद केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी राष्टÑीय काँग्रेसचे संजय पाटील यांनी शिष्ठमंडळासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हा पुरवठा अधिकाारी विवेक आगवणे यांना मिठाचा बॉक्स भेट दिला.