सेवानिवृत्तीनंतर समाजकार्यासाठी वेळ द्या : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:07+5:302021-06-29T04:17:07+5:30
बळवंतराव झेले हायस्कूलमध्ये शिक्षक दिलीप चिकुर्डेकर, लिपिक सुनील शिंदे, नीशा भोसले यांच्या सत्कारप्रसंगी मंत्री यड्रावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश ...
बळवंतराव झेले हायस्कूलमध्ये शिक्षक दिलीप चिकुर्डेकर, लिपिक सुनील शिंदे, नीशा भोसले यांच्या सत्कारप्रसंगी मंत्री यड्रावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश पाटील होते. या वेळी चिकुर्डेकर यांनी संस्थेने सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल ऋण व्यक्त केले. या वेळी दादासाहेब लाड, प्रकाश झेले यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत मुख्याध्यापक डी. पी. पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ. यू. पी. शिरगावे, डी. एम. चव्हाण, एस. जी. लोंढे, डॉ. दीपाली चिकुर्डेकर, नगरसेविका प्रेमला मुरगुंडे, अभिजित पाटील, राजेंद्र झेले, दादासाहेब पाटील-चिंचवाडकर, एफ. वाय. कुंभोजकर, बालवीर पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एस. माणगावे तर पर्यवेक्षिका बी. ए. कोगनोळे यांनी आभार मानले.
फोटो - २८०६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे झेले हायस्कूलमध्ये शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.