युवकांना जबाबदारीचे भान द्याव

By Admin | Published: December 30, 2014 09:24 PM2014-12-30T21:24:45+5:302014-12-30T23:38:49+5:30

दिनकर पाटील : देवगडमध्ये राज्यस्तरीय विकास शिबिरे

Give the youth the responsibility of responsibility | युवकांना जबाबदारीचे भान द्याव

युवकांना जबाबदारीचे भान द्याव

googlenewsNext

देवगड : समाजात वावरताना समाजाचा एक घटक म्हणून आपल्यावर एक जबाबदारी येऊन पडते. या जबाबदारीचे भान युवकांना देणे खूप महत्त्वाचे आहे. युवावर्ग देशाचा कणा आहे. लोकशाहीचा मोठा आधारस्तंभ आहे. कारण उद्याची भावी पिढी घडविताना त्यांनी समाजासाठी नेमके काय करावयाचे याचे प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे मत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणेचे शिक्षण सहसंचालक दिनकर पाटील यांनी व्यक्त केले.
शिक्षण विकास मंडळ स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नलिनी शांताराम पंतवालावलकर कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर आयोजित सामाजिक बांधीलकीतून समाजकार्य या तीनदिवसीय राज्यस्तरीय विकास निवासी शिबिराचे उद्घाटन व युवा स्मरणिकेचे प्रकाशन शिक्षण सहसंचालक दिनकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते.
यावेळी शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष जनार्दन तेली, कार्यवाह प्रसाद पारकर, प्रमोद नलावडे, प्राचार्य डॉ. भारत भोसले, कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, राष्ट्रीय सेवा योजना, कोल्हापूर विभागाचे सहायक शिक्षण संचालक संपत गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना अहमदनगर कॉलेजचे प्रशिक्षण समन्वयक डॉ. अभय शाळीग्राम, आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष जनार्दन तेली यांनी मार्गदर्शन केले. डॉ. तरुजा भोसले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शरद शेट्ये यांनी आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणांहून विविध विभागांचे समन्वयक, पर्यवेक्षक, तसेच विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)


चार सत्रांतून मार्गदर्शन
देवगड महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमांच्या पहिल्या सत्रात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर कोल्हापूर येथील अशोक रोकडे यांनी व्हाईट आर्मी टीम हे व्याख्यान व प्रात्यक्षिक सादर केले होते.
दुसऱ्या सत्रात दुपारी कोल्हापूरचे प्रा. किशोर शिंदे यांनी सर्पविज्ञान विषयावर स्लाईड शो दाखविला.
तिसऱ्या सत्रात ‘खेळातून निसर्ग अभ्यास प्रात्यक्षिक’ कोल्हापूर निसर्गमित्रचे सचिव अनिल चौगुले यांनी सादर केले.
चौथ्या सत्रात रात्री ‘आई समजून घेताना’ या विषयावर कोल्हापूर येथील संपत गायकवाड यांनी व्याख्यान दिले.


शिक्षणाबरोबर विकास हवा : पाटील
दिनकर पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवक समाजसेवेचे विविध उपक्रम राबवित आहेत. समाजात आज अनेक समस्या भेडसावताना दिसतात. अशा परिस्थितीत विद्यार्थी प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधतात.
विद्यार्थ्यांनाही समाजाची स्थिती समजते आणि आपणही समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही जाणीव त्यांच्यात आपसुकच निर्माण होते. पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाची ही सांधेजोड असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Give the youth the responsibility of responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.