जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणार : सुभेदार
By admin | Published: April 27, 2017 01:00 AM2017-04-27T01:00:47+5:302017-04-27T01:00:47+5:30
जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला प्राधान्य देऊन अॅग्रो टुरिझमचा विकास करून शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. याबरोबरच जोतिबा परिसरासह जिल्ह्यातील सर्व देवस्थानांचा विकास करून भाविकांना सुविधा उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी बुधवारी केले.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्ती झालेल्या अविनाश सुभेदार यांनी डॉ. सैनी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळित, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिथडे, जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य लेखाधिकारी गणेश देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस. जी. किणिंगे यांची उपस्थिती होती. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी नूतन जिल्हाधिकारी सुभेदार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी सैनीयांची बदली झाली असली तरी अद्याप त्यांच्या नेमणुकीचे ठिकाण निश्चित झालेले नाही.
सुभेदार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्णात यापूर्र्वी काम केले असल्याने जिल्ह्णातील महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्याला माहिती आहे. सातबारा संगणकीकरणाला गती देण्याबरोबरच पर्यटन विकासाला चालना देणार आहे. कोल्हापूर जिल्हा हा विकासाचा ध्यास असलेल्या लोकांचा जिल्हा आहे. चांगल्या, नव्या कल्पना लोक स्वीकारतात व त्यामध्ये सहभागी होतात. जिल्ह्णात अॅग्रो टुरिझमला चांगली संधी असून त्याचा विकास करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देऊ. विमानतळ लवकर सुरू झाला तर दळणवळण वाढेल. त्यामुळे त्यासाठीही प्राधान्याने प्रयत्न केले जातील. जिल्ह्णातील गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून, या गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना केल्या जातील. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत १८ गावे शासकीय निकषांनुसार निवडण्यात आली असली तरी ५६ गावांमध्ये हे अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या सर्व गावांमधून जलयुक्त शिवारची कामे प्राधान्याने करण्यात येतील. तसेच पंचगंगेच्या प्रदूषण प्रश्नासह जोतिबा विकास आराखडा विमानतळ, आदी प्रश्नांवरही येणाऱ्या काळात लक्ष केंद्रित करण्यात येईल.