मिरवणुकीसह गुलाल, डॉल्बीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:36 AM2017-10-17T00:36:03+5:302017-10-17T00:36:07+5:30

Glee with procession, ban on the dolbie | मिरवणुकीसह गुलाल, डॉल्बीवर बंदी

मिरवणुकीसह गुलाल, डॉल्बीवर बंदी

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज, मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती सोमवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
त्याची मतमोजणी ज्या-त्या तालुक्यांच्या ठिकाणी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर कार्यकर्ते जल्लोषात गुलाल उधळण्याची शक्यता आहे. त्यातून विरोधी गटाबरोबर वाद होण्याची शक्यता असल्याने विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच निकालानंतर गाड्यांचे सायलेन्सर काढून दंगामस्ती करणाºया कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. जिल्ह्यातील गावागावांत पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत, तर ४७ संवेदनशील गावांमध्ये राज्य राखीव दलाचे जवान तळ ठोकून आहेत. अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक असे तीन हजार पोलीस जिल्ह्यावर लक्ष ठेवून असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
वाहतूक मार्गात बदल
करवीर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींची मतमोजणी कसबा बावडा, रमणमळा शासकीय धान्य गोदाम येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मुख्य टपाल कार्यालय ते मतमोजणी ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. महावीर कॉलेज ते कसबा बावड्याकडे जाणारी सर्व वाहने जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृह मार्गे ये-जा करतील. कसबा बावड्याकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी वाहने ही भगवा चौक, धैर्यप्रसाद हॉल मार्गे ये-जा करतील, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी
दिली.
जिल्ह्यात २८६ टेबलांवर मतमोजणी

जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींसाठी आज, मंगळवारी सकाळी दहापासून जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरूहोणार आहे. २८६ टेबलांवर ही मतमोजणी होणार असून, यासाठी १७२८ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ८५८ कर्मचारी व ८७० निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांचा समावेश आहे. प्रत्येक टेबलला तीन कर्मचारी असे नियोजन करण्यात आले आहे.
तालुका ग्रामपंचायती स्त्री पुरुष एकूण टक्केवारी
करवीर ५० ६५४६३ ७२४३३ १३७८९६ ७७.९०
गगनबावडा १७ ५७९२ ६३४९ १२१४१ ९१.८९
हातकणंगले ४० ९५४६३ ८४१८४ १७९६४७ ८२.५७
शिरोळ १४ १९९४४ २१८५४ ४१७९८ ८६.७८
कागल २६ २२९१५ २४४२२ ४७३३७ ९१.१७
राधानगरी ५७ ४२९०८ ४८९६० ९१८६९ ९१.०९
आजरा ३१ १८८६३ १८१८८ ३७०५१ ८५.०७
भुदरगड ३७ २३४५२ २४६९७ ४८१४९ ८९.२९
पन्हाळा ४६ ३२९२९ ३६०६६ ६८९९५ ९१.७८
शाहूवाडी ४५ २९३९० ३११८२ ६०५७२ ८७.०७
चंदगड ३८ २०१२९ २०४२९ ४०५५८ ८४.१४
गडहिंग्लज ३४ २७१०९ २७१२७ ५४२३६ ८१.०८
एकूण ४३५ ४०४३५७ ४१५८९१ ८२०२४९ ८४.९१

दुपारपर्यंत पडणार गुलाल
जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींसाठी आज, मंगळवारी सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील पहिला निकाल गगनबावडा तालुक्यातून लागण्याची शक्यता आहे. कारण या तालुक्यातील ग्रामपंचायती व मतदारांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. त्याचबरोबर दुपारी एकपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतींचा निकाल लागून सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या पद्धतीने निवडणूक विभागाने नियोजन केले आहे.

Web Title: Glee with procession, ban on the dolbie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.