अब्दुललाटमध्ये सामाजिक काम केलेल्या तरुण मंडळांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:28 AM2021-09-07T04:28:41+5:302021-09-07T04:28:41+5:30
अब्दुललाट : येथील गंदगीमुक्त भारत अभियानांतर्गत सामाजिक काम केलेल्या तरुण मंडळांचा गौरव येथील युवाशक्तीच्या वतीने करण्यात आला. यावेळी जारकीहोळ ...
अब्दुललाट : येथील गंदगीमुक्त भारत अभियानांतर्गत सामाजिक काम केलेल्या तरुण मंडळांचा गौरव येथील युवाशक्तीच्या वतीने करण्यात आला. यावेळी जारकीहोळ मठाचे कृपानंद स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धा गतवर्षी घेण्यात आल्या. यामध्ये ६५ गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदविला. तसेच कोरोना काळात सामाजिक कार्य केलेल्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेमध्ये झेंडा चौक तरुण मंडळ, श्रीमूर्ती गणेश मंडळ व शहीद भगतसिंग तरुण मंडळ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. मंडळांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. शरद पाटील यांनी स्वागत केले. यावेळी जि. प. सदस्य विजय भोजे, विद्याधर कुलकर्णी, गुरुकुल शिक्षण समूहाचे बळवंत नायकुडे, संजय आवळे, डी.बी.पाटील, संजय कुरणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रवींद्र खवले यांनी केले. दशरथ लोहार यांनी आभार मानले.
फोटो ओळी
०६०९२०२१-आयसीएच-०१
अब्दुललाट ता. शिरोळ येथे सामाजिक काम केलेल्या तरुण मंडळांचा गौरव कृपानंद स्वामी यांनी केला.