कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी बँकेत जावा; मिळत आहे विशेष कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 09:48 AM2020-04-29T09:48:46+5:302020-04-29T09:52:01+5:30
कोल्हापुरातील अग्रणी बँक असणा-या बँक आॅफ इंडियाने आर्थिक संकटात असणाºयासाठी ‘कोविड १९ पर्सनल लोन’ या नावाने अनोखी कर्ज योजना सुरू केली आहे. त्याद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे.
कोल्हापूर : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्यांच्या मदतीला बँका सरसावल्या आहेत. बँकेत पगार जमा होणाºया कायम कर्मचाऱ्यांसाठी बँक आॅफ इंडियाच्या वतीने ‘कोविड १९ पर्सनल लोन योजना’ आणली आहे. त्याद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केले असून, विशेष म्हणजे जूननंतर हप्ता सुरू होणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी केली आहे. घरातून बाहेर पडता येत नसल्यामुळे अनेकांसमोर आर्थिक संकट उभारले आहे. शासकीय कर्मचाºयांच्या पगारातही कपात केली आहे; तर काही संस्थांमध्ये निम्मे पगार दिले जात आहेत. यामुळे अडचणींत भर पडली आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संघटना, संस्था पुढे आल्या आहेत. यामध्ये बँकांनीही पुढाकार घेतला आहे. कोल्हापुरातील अग्रणी बँक असणा-या बँक आॅफ इंडियाने आर्थिक संकटात असणाºयासाठी ‘कोविड १९ पर्सनल लोन’ या नावाने अनोखी कर्ज योजना सुरू केली आहे. त्याद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे.
कोरोनाच्या संकटात नफ्याचा विचार न करता सामाजिक बांधीलकी म्हणून ‘कोविड १९ पर्सनल लोन’ सुरू केले आहे. लक्ष्मीपुरी शाखेत सहा हजार कर्मचाºयांचे पगार जमा होतात. यामध्ये कायम कर्मचाºयांसाठी योजना लागू आहे. खात्यावर किमान एक वर्ष पगार जमा होणे आवश्यक आहे.
व्ही. एम. भातकांडे, मुख्य प्रबंधक, बँक आॅफ इंडिया, लक्ष्मीपुरी शाखा
पगार जमा होणाºया खातेदारांसोबत बँकेत हाउसिंग कर्ज घेतलेले तसेच व्यावसायिकांनाही अशा प्रकारचे कर्ज मिळू शकते. त्यांनी आवश्यक कागदपत्रांसोबत आयटी रिटर्न द्यावे लागणार आहे.
- प्रतिभा जाधव, मुख्य व्यवस्थापक, कर्ज विभाग, लक्ष्मीपुरी शाखा
- -कर्जाचा व्याजदर - केवळ ७.२५ टक्के
-कर्ज रक्कम - पगाराच्या तीनपट
-हप्ता सुरू - ३० जूननंतर
-------------------------------------
- कर्जास पात्र- बँक आॅफ इंडियामध्ये पगार जमा होणारे खातेदार
कर्जमागणीसाठी आलेले अर्ज- ५0
वाटप कर्ज- ३0 खातेदारांना
कर्जाची सोय- कोल्हापूर, सांगली, सातारा येथील बँक आॅफ इंडियाच्या ११० शाखांत.
आवश्यक कागदपत्र
- गेल्या तीन महिन्यांतील पगारपत्रक
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- फोटो-२
- १६ नंबर फॉर्म, आयकर विवरण पत्र
कमी व्याजदरात यांना मिळणार कर्ज
- केएमटी कर्मचारी
- पोलीस प्रशासनातील कर्मचारी
- जिल्हा परिषद
- जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी
- तहसील कार्यालय
-
इतर बँकांनाही योजना सुरू करण्याची गरज
कोल्हापुरातील सर्वच पगारदारांची खाती बँक आॅफ इंडियामध्ये नाहीत. अशा संकटसमयी इतर बँकांनीही अशा प्रकारची पर्सनल कर्ज योजना सुरू करण्याची गरज आहे.