सीमेवर जाऊन मला सैनिकांसाठी गायचंय

By admin | Published: January 24, 2017 12:47 AM2017-01-24T00:47:34+5:302017-01-24T00:47:34+5:30

आशा भोसले : जिल्हाधिकारी कार्यालयात भेटी दरम्यान व्यक्त केली भावना

Go to the border and sing for soldiers | सीमेवर जाऊन मला सैनिकांसाठी गायचंय

सीमेवर जाऊन मला सैनिकांसाठी गायचंय

Next



सातारा : ‘आपले प्राण हातात घेऊन जीवाची बाजी लावून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी मला सीमेवर जाऊन गायचे आहे. जीवनातले हे समाधान मला मिळवायचे आहे,’ अशी भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यक्त केली.
कऱ्हाड तालुक्यातील आपल्या जमिनीच्या प्रकरणाबाबत आशा भोसले मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याशी बोलत असताना आशा भोसले भलत्याच भावूक झाल्या.
‘सीमेवरल्या वीरांशी माझं अतूट नातं आहे. मी सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गाणे कमी केले आहे. मी आता प्रादेशिक भाषेत गाते. माझ्या जीवनात मी खूप गायले. या गायनाच्या माध्यमातून असंख्य लोकांना आनंद दिला. माझ्या आयुष्यातलं एक काम राहिलंय, ते म्हणजे सीमेवर जायचं आणि सैनिकांसाठी विनामोबदला गायचं आहे.’
आशा भोसले यांच्याशी भेटण्याचा दुर्मीळ योग आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली. अनेकींनी त्यांच्यासोबत ‘सेल्फी’ काढले. ही ग्रेट भेट कायमस्वरूपी लक्षात राहील, अशी भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कऱ्हाड तालुक्यातील पतीच्या नावे असणाऱ्या जमिनीच्या संपादनाबाबत आशा भोसले यांची तक्रार होती. मात्र, यासंदर्भात जमिनीचे सर्व कागदपत्रे पाहून निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Go to the border and sing for soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.