नागरिकांची घरी जाऊन कोविड चाचणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:16 AM2021-07-08T04:16:27+5:302021-07-08T04:16:27+5:30
: कबनूरला भेट कबनूर : गावातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर जास्त असल्याने घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कोविड चाचण्या वाढवा, ...
: कबनूरला भेट
कबनूर : गावातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर जास्त असल्याने घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कोविड चाचण्या वाढवा, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिला.
ग्रामपंचायतीच्या सभागृहात कोविड आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कबनूरची लोकसंख्या साठ हजारांवर असून अद्यापही १० टक्केही कोविड चाचणी केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कोविड उपाययोजनेसाठी शासनाने १५ व्या वित्त आयोगातून २५ टक्के निधी खर्च करण्याची मुभा दिली असताना याकामी जर निधी खर्च होत नसेल, तर या निधीला स्थगिती का देऊ नये, असा सवाल मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केला. साजणी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरगावे यांनी कामात हयगय केल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजवावी, असे आदेश चव्हाण यांनी दिले. कोविड चाचणीसाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असे ते म्हणाले.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार डॉ. प्रदीप उबाळे, शरद पाटील, शबाना मोकाशी, सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील, जि. प. सदस्या विजया पाटील, जे. आर. गोन्साल्विस, एस. डी. पाटील, बी. टी. कुंभार, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
०७०७२०२१-आयसीएच-०३
कबनूर (ता. हातकणंगले) येथील कोरोनासंदर्भात प्रभारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी मार्गदर्शन केले.