गो. मा. पवार यांचे कोल्हापूरशी घनिष्ठ संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:51 PM2019-04-16T23:51:04+5:302019-04-16T23:51:09+5:30

कोल्हापूर : लेखनाला केवळ साहित्य, संस्कृती आणि वाङ्मयापुरते मर्यादित न ठेवता त्याला समाजशास्त्राशीही जोडू पाहणारे लेखक गो. मा. पवार ...

Go. Ma Close relationship with Pawar to Kolhapur | गो. मा. पवार यांचे कोल्हापूरशी घनिष्ठ संबंध

गो. मा. पवार यांचे कोल्हापूरशी घनिष्ठ संबंध

googlenewsNext

कोल्हापूर : लेखनाला केवळ साहित्य, संस्कृती आणि वाङ्मयापुरते मर्यादित न ठेवता त्याला समाजशास्त्राशीही जोडू पाहणारे लेखक गो. मा. पवार यांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध होता. शिवाजी विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या सर्जनशील उपक्रमांनी या विभागाचा राज्यात दबदबा निर्माण केला. त्यांच्या मुशीत अनेक लेखक घडले.
आधुनिक मराठी साहित्याचे पाठीराखे म्हणून पवार यांचे नाव घेता येईल. शिवाजी विद्यापीठात पहिले विभागप्रमुख म्हणून घेतलेल्या जबाबदारीपासून ते दर्जेदार अभ्यासक्रम, सर्जनशील उपक्रम आणि तज्ज्ञ लेखकांशी मुक्तसंवादातून त्यांनी नवलेखक घडविले. ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभे’च्या वतीने पेठवडगाव येथे भरविण्यात आलेल्या अधिवेशनात त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
विद्यापीठ हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र असले तरी समाजवादी विचारसरणी असल्याने कोल्हापूरच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाशी त्यांची नाळ जुळली होती. मराठीला वाङ्मयाच्या चौकटीत न बसविता तिला सामाजिकशास्त्राची जोड मिळावी यासाठी त्यांची धडपड असायची. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कामगार नेते गोविंद पानसरे यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री जुळली ती या विचारांच्या धाग्यामुळेच. शाहू छत्रपती यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. साहित्यक्षेत्रात रणजित देसाई, शिवाजी सावंत अशा लेखकांशी त्यांचा कायम संवाद असायचा.
मराठी विभागाची उभारणी
ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार हे सन १९७९ मध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये रुजू झाले. त्यांनी विद्यापीठातील मराठी विभागाची उभारणी केली. या विभागाचे ते पहिले प्रमुख होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते, कवी यांना निमंत्रित करून त्यांची चर्चासत्रे, व्याख्यानांचे आयोजन असे विविध उपक्रम सुरू केले. १९८४ साली त्यांनी ‘मराठी साहित्य : प्रेरणा आणि समाज’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रानंतर शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे नाव राज्यातील अन्य विद्यापीठांमध्येही आदराने घेतले जाऊ लागले. या विभागाचा वेगळा दबदबा त्यांनी निर्माण केला. ते १९९२ पर्यंत कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी पीएच.डी., तर २२ विद्यार्थ्यांनी एम. फिल. पदवी संपादन केली आहे.
विद्यापीठात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन, कार्याचा अभ्यास आणि संशोधन होण्यासाठी अध्यासन स्थापन करण्याबाबत डॉ. पवार यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाला सुचविले होते. त्यानुसार सन २००० मध्ये विद्यापीठात ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासना’ची स्थापना करण्यात आली.
डॉ. गो. मां.ची ग्रंथसंपदा
च्विनोद : तत्त्व व स्वरूप
च्मराठी विनोद : विविध अविष्काररूपे
च्निवडक फिरक्या
च्निवडक मराठी समीक्षा
च्महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य
च्निवडक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
च्महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : भारतीय साहित्याचे निर्माते
च्महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : समग्र वाङ्मय खंड १ व २
च्द लाईफ अँड वर्क्स आॅफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
मिळालेले सन्मान
च्साहित्य अकादमी पुरस्कार नवी दिल्ली च्भैरूरतन दमाणी पुरस्कार सोलापूर च्शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डूवाडी च्रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, वाई च्पद्मश्री विखे-पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरा नगर च्महाराष्ट्र फाउंडेशन मराठी साहित्य पुरस्कार, मुंबई च्महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार,
च्धोंडिराम माने साहित्यरत्न पुरस्कार, औरंगाबाद
च्शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार, सोलापूर च्मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, औरंगाबाद


ज्येष्ठ साहित्यिक गो. मा. पवार यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अतिशय दु:ख होत आहे. शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागाच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुजू झाल्यानंतर ते मला भेटून गेले होते. एका मोठ्या साहित्यिकाला आपण मुकलो आहोत.
- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे,
शिवाजी विद्यापीठ

Web Title: Go. Ma Close relationship with Pawar to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.