कोल्हापुरमध्ये १३ लाख किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 08:07 PM2021-11-27T20:07:32+5:302021-11-27T20:09:09+5:30
गोवा बनावटीच्या दारुची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या राजस्थानातील ट्रका चालकासह सुमारे १३ लाख किंमतीचा मद्यसाठ्यासह ट्रक असा सुमारे ३० लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.
कोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारुची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या राजस्थानातील ट्रका चालकासह सुमारे १३ लाख किंमतीचा मद्यसाठ्यासह ट्रक असा सुमारे ३० लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
याप्रकरणी ट्रक चालक मोहन भवरसिंह (वय ३९, रा. नयापूर, गोंगुंदा, उद्यपुर-राजस्थान) याला ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले. ट्रकमध्ये गोवा बनावटीचा १२ लाख ८९ हजार १८४ रुपयांचा मद्यसाठा मिळाला.
याबाबत माहिती अशी की, अशोक लेलंन्ड ट्रक नंबर (एम.एच.१२-पीक्यू-८२६२) यातून गोवा बनावटीच्या मद्यांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी विशेष पथकांना सुचना देवून सापळा रचला. या पथकातील सुरेश पाटील, आसिफ कलायगार, विनायक कांबळे, वसंत पिंगळे, रणजित पाटील, विलास किरोळकर, अनिल पास्ते, संजय पडवळ यांनी गारगोटी रोडवरील इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा रचून संशयित ट्रक कावणे गावच्या हद्दीमध्ये आला असता त्याला थांबवून तपासणी केली. यावेळी या ट्रकमध्ये मद्यसाठा मिळून आला.
याप्रकरणी ट्रक चालक मोहन भवरसिंह याला ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव करीत आहेत.