क्लासवन अधिकारी घडविणे हेच ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:21 AM2021-04-26T04:21:52+5:302021-04-26T04:21:52+5:30
गडहिंग्लज : झेप अकॅडमीच्या माध्यमातून ३ वर्षांत १२ प्रशिक्षणार्थ्यांची वर्ग-३ चे अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मात्र, गडहिंग्लज परिसरातून ...
गडहिंग्लज : झेप अकॅडमीच्या माध्यमातून ३ वर्षांत १२ प्रशिक्षणार्थ्यांची वर्ग-३ चे अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मात्र, गडहिंग्लज परिसरातून अधिकाधिक क्लास वन अधिकारी निर्माण व्हावेत, हेच आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन ज्ञानदीप प्रबोधिनीचे संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा परीक्षेद्वारे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य सेवा विभागात 'सांख्यिकी अन्वेषक'पदी निवड झाल्याबद्दल झेप अकॅडमीतर्फे प्रशिक्षणार्थी सुनीता बाळासाहेब रानगे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
चौगुले म्हणाले, केवळ देणगीदारांच्या सहकार्यावर अकॅडमी चालविता येणार नाही. त्यासाठी संस्थेने उत्पन्नाचे नवे मार्गही शोधले पाहिजेत. काही नवे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. सामाजिक उपक्रमांसह नव्या अभ्यासक्रमांसाठीही सर्वांनी मनापासून साथ द्यावी.
रानगे म्हणाल्या, झेपमधील तज्ज्ञांच्या व्याख्यानातूनच ऊर्जा मिळाली. मुंबई, पुण्यातही ‘झेप’सारखी अभ्यासिका उपलब्ध नाही. या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
यावेळी प्रबोधिनीचे सचिव संदीप कागवाडे, सहसचिव प्रा. व्ही. के. मायदेव, खजिनदार महेश मजती, संचालक रंगा शिंगटे, नंदकुमार शेळके, महादेव पाटील, उमा तोरगल्ली, श्वेता टोण्णावर, आदी उपस्थित होते.
प्राचार्य मीना रिंगणे यांनी स्वागत केले. गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केले. रेखा पोतदार यांनी आभार मानले.
------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे सुनीता रानगे यांचा एम. एल. चौगुले यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी संदीप कागवाडे, व्ही. के. मायदेव, महेश मजती, रंगा शिंगटे, नंदकुमार शेळके, महादेव पाटील, उमा तोरगल्ली, मीना रिंगणे, रेखा पोतदार, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २५०४२०२१-गड-०४