शित्तूर-वारूण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:16 AM2021-07-19T04:16:49+5:302021-07-19T04:16:49+5:30

चांदोली अभयारण्यालगत असलेल्या शित्तूर-वारूण गावासह वाड्या-वस्त्यांमध्ये बिबट्याचा सतत वावर आहे. आनंदा पाटील यांच्या घराच्या मागच्या बाजूस असलेल्या गोठ्यामध्ये बांधलेल्या ...

Goat killed in leopard attack at Shittur-Varun | शित्तूर-वारूण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

शित्तूर-वारूण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

googlenewsNext

चांदोली अभयारण्यालगत असलेल्या शित्तूर-वारूण गावासह वाड्या-वस्त्यांमध्ये बिबट्याचा सतत वावर आहे. आनंदा पाटील यांच्या घराच्या मागच्या बाजूस असलेल्या गोठ्यामध्ये बांधलेल्या या शेळीवर बिबट्याने हल्ला चढवला. आज सकाळी पाटील आपल्या गोठ्यामध्ये गेले असता त्यांना ही शेळी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली.

या घटनेची माहिती त्यांनी वन विभागास कळविल्यानंतर मलकापूर वन परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक शंकर जाधव, शिवाजी भोसले यांनी घटनेचा पंचनामा केला.

Web Title: Goat killed in leopard attack at Shittur-Varun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.