जोतिबावरील पुजाऱ्यांचा प्रामाणिकपणा, भक्ताचे १८000 रुपये रोख केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 03:59 PM2018-10-22T15:59:07+5:302018-10-22T16:02:11+5:30
जोतिबा मंदिरात श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या ठाण्याच्या भक्ताकडील रोख रक्कम मंदिरात पडले, मात्र मंदिरातील पुजाऱ्यांना ही रक्कम मिळताच ती त्यांनी संबधित भक्तांशी संपर्क साधून परत केली.
जोतिबा/ href="http://www.lokmat.com/topics/kolhapur/">कोल्हापूर : जोतिबा मंदिरात श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या ठाण्याच्या भक्ताकडील रोख रक्कम मंदिरात पडले, मात्र मंदिरातील पुजाऱ्यांना ही रक्कम मिळताच ती त्यांनी संबधित भक्तांशी संपर्क साधून परत केली.
सुरज उपाधे यांचे भक्त श्री जोतिबा देवास अभिषेक करण्यासाठी मंदीराच्या गाभार्यात गेले असता त्यांनी आपले पैशाचे पाकीट आपल्या पत्नीपाशी ठेवण्यासाठी दिले. मात्र त्या पाकीटमधून १८000 रुपये रोख मंदिरात पडले.
ते पैसे संबंधित पुजारी सचिन बाळु सातार्डेकर व निलेश धोंडिराम झुगर ' यांना मिळून आले. त्यांनी ती रक्कम
महेश बोरकर (ठाणे-मुंबई) या भक्ताचे १८000 रुपये रोख परत केले. भाविकांमधून या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे