अवघ्या तीन तासांत गोव्यात जाता येणार आहे-संकेश्वर ते बांदा मार्गाचा ‘डीपीआर’ करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:04 AM2019-06-28T01:04:26+5:302019-06-28T01:04:52+5:30

कोकणला आणखी नजीक आणण्यासाठी संकेश्वर ते बांदा १०६ किलोमीटर अंतराच्या नव्या राष्टय महामार्गाचा ‘डीपीआर’(विकास आराखडा) करण्याचे आदेश राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने दिले आहेत.

Going to Goa in just three hours- | अवघ्या तीन तासांत गोव्यात जाता येणार आहे-संकेश्वर ते बांदा मार्गाचा ‘डीपीआर’ करावा

अवघ्या तीन तासांत गोव्यात जाता येणार आहे-संकेश्वर ते बांदा मार्गाचा ‘डीपीआर’ करावा

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या महामार्गाला मंजुरी; १०६ कि.मी.चे अंतर --‘राष्टय रस्ते विकास’चा आदेश

तानाजी पोवार ।

कोल्हापूर : कोकणला आणखी नजीक आणण्यासाठी संकेश्वर ते बांदा १०६ किलोमीटर अंतराच्या नव्या राष्टय महामार्गाचा ‘डीपीआर’(विकास आराखडा) करण्याचे आदेश राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने दिले आहेत. त्याचा ‘डीपीआर’ भारतीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. कोकणकडील व्यापाराला चालना मिळावी, परराज्यातून, तसेच मुंबई-पुणे मार्गे येणाऱ्या पर्यटकांना या महामार्गातून गोव्याकडे जाता यावे; यासाठी या नव्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात येत आहे.

सध्याच्या स्थितीत तवंदी घाट, शिपूर, आजरामार्गे गोवा अशी वाहतूक सुरू आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड संख्या आहे; पण रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पर्यटकांसह वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नव्याने होणारा हा राष्टÑीय महामार्ग पर्यटकांच्या आणि वाहनचालकांच्या सोईचा होणार आहे. हा ‘डीपीआर’ करताना मार्र्गावरील वाहतुकीची संख्या, मार्गासाठीचा अपेक्षित खर्च, भूसंपादनाची प्रक्रिया, जमीनधारकांना द्यावा लागणारा योग्य मोबदला, याचाही विचार होणार आहे. हा ‘डीपीआर’ तयार करून तो मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.


चौपदरीकरण की सहापदरीकरण?
परिसरातील जुन्या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनांच्या संख्येवरून हा नवा महामार्ग चौपदरीकरण की सहापदरीकरण करायचा हे विकास आराखड्यामध्ये निश्चित करण्यात येणार आहे.

कोकण व्यापाराला चालना
सध्याच्या स्थितीत दळणवळणाच्या दृष्टीने कोकणशी अनेक राज्यांचा संपर्क वाढला आहे. कोकणकडील व्यापाराला या नव्या महामार्गामुळे चालना मिळणार आहे. त्याचा महाराष्टÑ, कर्नाटकसह इतर राज्यांना फायदा होणार आहे.


गडहिंग्लज, आजरेकरांची उत्सुकता
हा नवा महामार्ग गडहिंग्लज आणि आजरा शहरांतून जाणार की बायपास, याबाबत दोन्हीही शहरवासीयांना उत्सुकता आहे; पण तो शहरातून नेण्यास त्यांचा विरोध राहणार असल्याचे दिसून येते.

नवा महामार्ग असा असेल..
सुमारे १०६ कि.मी. लांबीचा हा नवा राष्टÑीय महामार्ग संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली, बांदा असा असेल. या महामार्गावर कमीत कमी वळण, बाह्यवळण असतील. या मार्गावरून अवघ्या तीन तासांत गोव्यात जाता येणार आहे; त्यामुळे हा महामार्ग वाहनधारकांना सोईचा ठरणार आहे.


‘सावंतवाडी’करांची इच्छा

मुंबई ते गोवा हा राष्टÑीय महामार्ग सावंतवाडी गावाबाहेरून बाय्
ापास वळवून पुढे गेला. संकेश्वर ते बांदा हा नवा महामार्ग सावंतवाडी शहरापासून किमान ७ ते ८ कि.मी. अलीकडून वळण घेऊन पुढे जात आहे; पण हा मार्र्ग सावंतवाडी शहरातून जावा, अशी त्यांची इच्छा आहे; त्यामुळे या शहरातील व्यापारीकरणाला चालना मिळणार आहे.

Web Title: Going to Goa in just three hours-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.