मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार

By admin | Published: November 17, 2015 12:20 AM2015-11-17T00:20:03+5:302015-11-17T00:45:44+5:30

वसंतराव मुळीक : महासंघाच्या बैठकीत इशारा; प्रसंगी कायद्यात बदल करण्याची मागणी

Going on the road to the Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार

मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार

Next

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय आता उच्च न्यायालयात आहे. या ठिकाणी आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने भक्कमपणे बाजू मांडावी, प्रसंगी कायद्यात बदल करून समाजाला न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सोमवारी येथे दिला.
मराठा आरक्षणाची सद्य:स्थिती व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मराठा महासंघातर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. उत्तम जाधव, मिलिंद ढवळे-पाटील, संतोष सावंत, सर्जेराव पाटील, शैलजा भोसले आदी उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी उच्च न्यायालयात असलेला दावा भक्कमपणे लढवावा. प्रसंगी कायद्यात बदल करून मराठ्यांना न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. ‘मराठा भवन’ हे फक्त मराठा समाजाचे न राहता ते ‘बहुजनांचे मंदिर’ होईल, या पद्धतीने त्याची रचना केली जाणार आहे. मराठा महासंघाच्या १२३८ गावांमध्ये शाखा काढण्याचे नियोजन आहे. यामधील १०१ शाखा पुढील वर्षात सुरू होणार आहेत.
ते म्हणाले, अंबाबाईला विष्णूची पत्नी बनविण्याचा घाट घातला जात आहे. अंबाबाईच्या मस्तकावरील नाग नष्ट करून सिंहाचीही ओळख पुसण्याचे षङयंत्र रचले जात आहे. या विरोधात प्रबोधनपर चळवळ उभी करण्यात आली आहे. जोपर्यंत अंबाबाईच्या मस्तकावर नाग घडविला जात नाही तोपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचबरोबर मंदिरातील देवाच्या गाभाऱ्यातील पैशावर पुजारी मालकी हक्क सांगतात. त्या विरोधातही लढा उभारून हे पैसे देवस्थानकडे जावेत यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील. आमचा लढा दक्षिणा हडपणाऱ्या पुजाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे सर्व समाज बांधव आमच्या अंबाबाईच्या प्रबोधन चळवळीत सहभागी झाले आहेत.
मारुती मोरे म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी प्रत्येक ग्रामपंचायतीमधून मासिक सभांचे व विशेष सभांचे ठराव पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोळा करावेत.
यावेळी शिवाजीराव गराडे, शिवाजीराव पाटील, अवधूत पाटील, शंकरराव शेळके, संगीता राणे, दीपाली डोणे, संदीप पाटील, आदी उपस्थित होते. उत्तम जाधव यांनी स्वागत केले. शशिकांत पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Going on the road to the Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.