Gokak Water Falls: ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा झाला प्रवाहित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:45 PM2022-04-22T12:45:28+5:302022-04-22T12:46:17+5:30
ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांना धबधबा पाहण्याची संधी मिळत आहे.
बेळगाव : देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा प्रसिद्ध धबधबा ऐन उन्हाळ्यात प्रवाहित झाला आहे.
विजापूर, बागलकोट, जमखंडी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हिडकल जलाशयातून दोन टीएमसी पाणी घटप्रभा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोकाक धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांना धबधबा पाहण्याची संधी मिळत आहे.
पण यंदा विजापूर, बागलकोट जमखंडी भागात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. या भागातील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने हिडकल जलाशयातून दोन टीएमसी पाणी सोडले आहे.