Gokul Milk Election : लोकमतच ठरला भारी.. अंदाज निकालानंतर तंतोतंत खरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 07:28 PM2021-05-04T19:28:53+5:302021-05-04T20:02:31+5:30
Gokul Result: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत सत्तारुढ आघाडीने सत्तेचा दावा केला असला तरी विरोधकांचीच सरशी होणार असल्याचे लोकमतने मतदानानंतर सोमवारच्या अंकात अगदी स्पष्टपणे जाहीर करून गोकूळ दूध संघाचा निकाल काय लागेल याचा अंदाज वर्तवला होता. तो निकालानंतर तंतोतंत खरा ठरला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत सत्तारुढ आघाडीने सत्तेचा दावा केला असला तरी विरोधकांचीच सरशी होणार असल्याचे लोकमतने मतदानानंतर सोमवारच्या अंकात अगदी स्पष्टपणे जाहीर करून गोकूळ दूध संघाचा निकाल काय लागेल याचा अंदाज वर्तवला होता. तो निकालानंतर तंतोतंत खरा ठरला आहे.
निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो की जिल्हा परिषद, महापालिकेची असो. गेल्या दहा वर्षात लोकमतने कोणत्याही निवडणूकीचे अंदाज निकालाच्या आधीच वर्तवले आहेत ते तंतोतंत खरे ठरले आहेत. लोकमतने २००९ च्या लोकसभा निवडणूकीत मंडलिक-शेट्टी विजयी होणार असे महिनाभर अगोदर जाहीर केले होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीतही निकालापूर्वीच धनंजय महाडिक-शेट्टी विजयी होणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे सहा आमदार विजयी होणार असल्याचे जाहीर केले, निकालही तसाच लागला. विधानसभेच्या गेल्या निवडणूकीत दहा मतदार संघात कोण विजयी होणार त्यांची नांवेच लोकमतने प्रसिध्द केली. निकालही अगदी तंतोतंत तसाच लागला.
गोकूळच्या निवडणूकीत पहिल्या दिवसापासून वार्तांकनात लोकमत सर्वात पुढे राहिला. या निवडणूकीतील निर्णायक ठरू शकणाऱ्या घडामोडी लोकमतने अगोदर दिल्या. त्यानुसारच निकालाचा कलही दिला. क्रॉस व्होटींग झाले नाही तर संघात सत्तांतर होणार असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारीच दिले होते. त्यानुसारच संघाच्या निवडणूकीचा निकाल लागला आहे.