‘गोकुळ’मुळेच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य - विक्रमसिंह सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:38+5:302021-05-29T04:18:38+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’ने कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक दूध व्यवसायाला व्यावसायिक स्वरुप देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य मिळवून दिल्याचे ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’ने कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक दूध व्यवसायाला व्यावसायिक स्वरुप देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य मिळवून दिल्याचे गौरवोद्गार आमदार विक्रमसिंह सावंत (जत) यांनी काढले.
आमदार सावंत यांनी ‘गोकुळ’दूध प्रकल्पास भेट दिली त्या वेळी ते बोलत होते. दूध संघाचे संकलन, मार्केटिंग, पशुवैद्यकीय सेवा आदींबाबत आमदार सावंत यांनी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचे स्वागत अध्यक्ष पाटील व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले. जत तालुका दूध संघाचे संचालक युवराज निकम, धैर्यशील सावंत, अतुल मोरे, काका शिंदे यांच्यासह ‘गोकुळ’चे अधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी : जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी ‘गोकुळ’ला भेट देऊन माहीती घेतली. या वेळी त्यांचे स्वागत अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. अरुण डोंगळे, युवराज निकम आदी उपस्थित होते. (फोटो-२८०५२०२१-कोल-गोकुळ)