गोकूळ निवडणुकीचा मार्ग मोकळा, याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 12:27 PM2021-03-02T12:27:35+5:302021-03-02T12:44:35+5:30
GokilMilk Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक आदेशाबाबत स्पष्टता करावी, यासाठी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पाच संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबलेली असताना केवळ गोकुळची निवडणूक कशी? असा मुद्दा गोकुळने न्यायालयात उपस्थित केला होता. यावर आज, मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे आता गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक आदेशाबाबत स्पष्टता करावी, यासाठी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पाच संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबलेली असताना केवळ गोकुळची निवडणूक कशी? असा मुद्दा गोकुळने न्यायालयात उपस्थित केला होता. यावर आज, मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे आता गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रक्रिया सुरू असणाऱ्या संस्थांना यातून वगळण्यात आले आहे. याबाबत ह्यगोकुळह्णची निवडणूक घेण्याबाबत ज्योतिर्लिंग दूध संस्था, केर्लीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ह्यगोकुळह्णसह अन्य पाच संस्थांचा याचिकेत समावेश होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने संबंधित संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश दिल्याचे निवडणूक प्राधीकरणाने म्हणणे आहे. त्यानुसार विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनिल शिरापूरकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सांगितले. यावर सत्तारूढ गटाने शुक्रवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत त्या आदेशाबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी केली होती.