गोकुळ दूध संघाची निवडणुक होणारच, उच्च न्यायालयाने याचिका अखेर फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 01:16 PM2021-03-12T13:16:16+5:302021-03-12T14:09:26+5:30

Gokul Milk Kolhapur- गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीच्या वादावर अखेर पडदा पडला असून उच्च न्यायालयाने पूर्वीचाच आदेश कायम करत गोकुळची याचिका अखेर फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी याला दुजोरा दिला आहे.

Gokul Dudh Sangh elections are about to take place, the High Court finally rejected the petition | गोकुळ दूध संघाची निवडणुक होणारच, उच्च न्यायालयाने याचिका अखेर फेटाळली

गोकुळ दूध संघाची निवडणुक होणारच, उच्च न्यायालयाने याचिका अखेर फेटाळली

googlenewsNext
ठळक मुद्देगोकुळ दूध संघाची निवडणुक होणारचउच्च न्यायालयाने याचिका अखेर फेटाळली

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीच्या वादावर अखेर पडदा पडला असून उच्च न्यायालयाने पूर्वीचाच आदेश कायम करत गोकुळची याचिका अखेर फेटाळली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही याची उत्कंठता शुक्रवारी संपली.

निवडणुकीसंदर्भात संचालक मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावत आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान प्राधिकृत अधिकारी डॉक्टर गजेंद्र देशमुख यांनी तीन हजार ६५६ सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराच्या आदेशानुसार निवडणूक ३१ मार्च पर्यंत स्थगित करावी, अशी मागणी गोकुळच्यावतीने केली होती.

कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे गोकुळच्या निवडणुकीलाही स्थगिती मिळावी, असा विनंती अर्ज गोकुळने उच्च न्यायालयात दाखल केला होता. यावर मंगळवार दि. २ रोजी सुनावणीत न्यायालयाने गोकुळची मागणी अमान्य केली होती. त्यानंतर पुन्हा नव्याने याचिका दाखल केली. यावर दोन वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळसह जिल्हा बँक व साखर कारखान्याच्या निवडणुकांनाही स्थगिती देण्यात आली होती. स्थगित झालेल्या टप्प्यापासून निवडणुकीची प्रकिया सुरू होईल, असे सांगण्यात आले होते, तथापि, यावरून संभ्रम निर्माण झाल्याने विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शनही मागवले; परंतु नंतर त्यांनीच ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करून त्यातील संदिग्धता दूर केली होती.

उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली. प्रारूप याद्यावरील आक्षेप घेण्याची मुदत संपल्याच्या दिवशीच पुन्हा एकदा स्थगितीचा आदेश आला. गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुनावणीवर निर्णय देताना गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Gokul Dudh Sangh elections are about to take place, the High Court finally rejected the petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.