गोकुळ निवडणूक वेळेतच होणार; मुश्रीफ-सतेज पाटील यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:24 AM2021-04-06T04:24:13+5:302021-04-06T04:24:13+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक ही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने कोरोनामुळे लांबणीवर टाकली ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक ही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने कोरोनामुळे लांबणीवर टाकली जाणार नसल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य शासनाने सोमवारपासून निर्बंध कडक केले त्या पार्श्वभूमीवर गोकुळ निवडणुकीचे काय होणार, अशी विचारणा पत्रकारांनी विरोधी आघाडीच्या या दोन नेत्यांना केली. ते म्हणाले, न्यायालयाने निश्चित करून दिलेल्या नियमावलींनुसार ही निवडणूक घेतली जाईल. संघाचे ३६५० इतकेच पात्र मर्यादित मतदार आहेत. देशात सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूका सुरू आहेत. नाशिकमध्ये नुकतीच जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाली आहे. त्यामुळे प्रक्रिया सुरू असलेली निवडणूक स्थगित करण्याचा किंवा लांबणीवर टाकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जाहीर कार्यक्रमानुसार २ मे रोजी गोकुळसाठी मतदान होईल. त्याबाबत कुणी संभ्रम निर्माण करू नये.