गोकूळ हे सीमा भागातील दूध उत्पादकाचा आर्थिक स्त्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:34+5:302021-07-02T04:17:34+5:30
कोल्हापूर: गोकूळ दूध संघ हा सीमा भागातील दूध उत्पादकांचा आर्थिक उन्नती स्त्रोत असून संघ कायमच या सीमावासीयांच्या पाठीशी राहिला ...
कोल्हापूर: गोकूळ दूध संघ हा सीमा भागातील दूध उत्पादकांचा आर्थिक उन्नती स्त्रोत असून संघ कायमच या सीमावासीयांच्या पाठीशी राहिला आहे, असे कौतुकोद्गार कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी यांनी काढले.
राणी चन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघ,श्री.सरस्वती महिला ऑप क्रेडिट सोसायटी व श्री समृद्धी महिला कृषी अभिवृद्धी सहकारी संघ लि,मालिकावाड ता. चिक्कोडी जि. बेळगाव या संस्थाचा नूतन वास्तूचे उद्घाटन समारंभ गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते व आमदार गणेश हुक्केरी, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, बाळासाहेब पाटील इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित झाले.
यावेळी विश्वास पाटील म्हणाले की कर्नाटकातील चिक्कोडी विभागातील पहिलीच दूध संस्था आहे. या संस्थेचे सुरुवात ४० लिटर दूध संकलनाने झाली होती. आज या संस्थेचे संकलन ५०० लिटरपर्यंत वाढवले आहे. भविष्यामधे संस्थेने जास्तीत जास्त म्हैस खरेदी करून म्हैस दूध वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहावे तसेच गोकूळच्या विविध योजनांचा लाभ दूध उत्पादकानी घ्यावा. ज्या संस्थेचे विश्वस्त चांगल्या विचारांनी संस्थेचे कामकाज करतात. त्या संस्था नेहमी प्रगतीपथावर आहेत. संस्थेच्या हिताचा जो विचार करतो. त्यातच संस्थेचे व सभासदाचे हित असते त्यासाठी काम करणारे विश्वस्त चांगले असले पाहिजेत.
फोटो: ०१०७२०२१-कोल-गोकूळ
गोकूळ अध्यक्ष विश्वास पाटील,आमदार गणेश हुक्केरी, माधवराव घाटगे यांच्या उपस्थितीत दूध संस्थाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन झाले. यावेळी बाळासाहेब पाटील, शोभा पाटील, याशोदिता पाटील, बबन चौगुले, राहुल घाटगे, श्रीपतराव जाधव, बी.आर.यादव, प्रदीप जाधव, आर.जी.डोमणे, अण्णासाहेब यादव, अजय सूर्यवंशी व संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.