कोल्हापूर: गोकूळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील यांच्या पत्नीचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 12:36 PM2022-10-06T12:36:01+5:302022-10-06T12:36:26+5:30
कै. आनंदराव पाटील यांच्या सहकार, राजकिय, सामाजिक जडणघडणीत मोलाची साथ दिली होती.
चुये : गोकूळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील (चुयेकर) यांच्या पत्नी व विद्यमान संचालक शशिकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती जयश्री आनंदराव पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. आज गुरूवार सकाळी ११ च्या सुमारास चुये येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी कै. आनंदराव पाटील यांच्या सहकार, राजकिय, सामाजिक जडणघडणीत मोलाची साथ दिली होती.
गोकूळच्या उभारणीत पाटील यांच्या खांद्याला खांदा देवून संघ स्थापनेपासून आज पर्यत त्यांनी कष्ट घेतले होते. गोकूळ हेच माझे कुंटूब आहे असे मानून त्यांनी सर्व त्याग पत्करून उभे आयुष्य खर्ची घातले. घरात सहकार क्षेत्राची विविध पदे असताना त्यांनी कोणत्याही पदाचा मोह बाळगला नव्हता. आपल्या सर्वसामान्य लोकांना पदे देण्याच्या सुचना त्या करत होत्या. कै. आनंदराव पाटील यांच्या मुत्युनंतर त्यांनी केवळ एकदाच गोकूळच्या संचालिका म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सहा मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.