गोकूळ महत्त्वाच्या चौकटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:59+5:302021-05-03T04:19:59+5:30
गतवर्षी संघाचे एकूण मतदान ३,२०० होते. त्या निवडणुकीत विरोधी आघाडीचे दोघे विजयी झाले. सत्तारूढ आघाडीचे विजयी उमेदवार वसंत खाडे ...
गतवर्षी संघाचे एकूण मतदान ३,२०० होते. त्या निवडणुकीत विरोधी आघाडीचे दोघे विजयी झाले. सत्तारूढ आघाडीचे विजयी उमेदवार वसंत खाडे यांना १,४७० तर विरोधी आघाडीचे पराभूत उमेदवार किशोर पाटील १,४२७ मते मिळाली होती. म्हणजे दोन्ही आघाड्यातील मतांचा फरक ४३ होता. यंदा सत्तारूढ आघाडीने ४०० मतदार वाढवले आहेत. त्यामुळे ती वाढ लक्षात घेऊन दोन्ही आघाड्याकडून मतांचे नियोजन करण्यात आले. गेल्या निवडणुकीत अरुण डोंगळे यांना सर्वाधिक १,७५५ मते मिळाली आणि वसंत खाडे यांना १,४७० मते मिळाली होती. याचा अर्थ एकाच आघाडीतील दोन उमेदवारांतील फरक २८५ मतांचा होता. या निवडणुकीतही क्रॉस मतदान मोठ्या प्रमाणात होणार असल्याने असाच फरक राहण्याची चिन्हे आहेत. सरासरी १,६०० मते घेईल तो उमेदवार विजयी होईल, असे चित्र दिसते.
नेत्यांच्याही शपथा..
दोन्ही गटाकडून ठरावधारक मतदारांना सहलीवर नेण्यात आले होते, त्यांच्या शपथाही घेतल्या होत्या. परंतु विरोधी गटाकडून नेत्यांच्या शपथा अगोदर घेण्यात आल्या. कारण विरोधी आघाडीकडे नेत्यांची संख्या जास्त होते. त्यांचे तालुक्यात लागेबांधे, नातलग रिंगणात असल्याने फुटीर मतदान झाल्यास त्यातून पूर्ण पॅनेलला धोका होऊ शकतो. यासाठी अगोदर नेत्यांनीच प्रामाणिक राहिले पाहिजे यासाठी सगळ्यांनी शपथा घेतल्या.
प्रचारातील प्रमुख मुद्दे
सत्तारूढ आघाडी
१. संघाचा पारदर्शी कारभार
२. शेतकऱ्यांना १३,२३ ला बिले देण्याची परंपरा
३. संघाचा कारभार उत्तम पद्धतीने चालविल्याचा दावा
विरोधी आघाडी
१. निवडून आल्यास लीटरला २ रुपये दर जास्त देणार
२. टँकरच्या भाड्यातून नेत्यांकडून लूट रोखणार
३. संघ महाडिक कुटुंबीयांच्या ताब्यात जाऊ देणार नाही