‘गोकुळ’ने गाय दूध दरात केली पुन्हा वाढ, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये
By राजाराम लोंढे | Published: December 6, 2022 12:01 PM2022-12-06T12:01:34+5:302022-12-06T12:17:59+5:30
देशात दूधाची टंचाई
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली आहे. आज, मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून पुणे, मुंबई व रायगड या जिल्ह्यात प्रतिलिटर ५४ रुपयांनी ग्राहकांना गाय दूध विकत घ्यावे लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र जुन्याच दराने विक्री होणार असून येथे प्रतिदिनी केवळ ३०० लिटरची दूध विक्री आहे.
देशात दूधाची टंचाई भासू लागल्याने राज्यातील सर्वच सहकारी व खासगी दूध संघांनी गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ केली होती. ‘गोकुळ’ने २७ ऑक्टोबरला गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली होती. मात्र विक्री दरात वाढ केली नव्हती. मात्र वाढीव दराने दूध खरेदी करुन जुन्या दराने विक्री करणे तोट्याचे ठरत असल्याने संचालक मंडळाने सोमवारी मध्यरात्री बारा पासून विक्री दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली आहे. हा दर मुबंई, पुणे, मुबंई उपनगर, ठाणे, रायगड येथे लागू होणार आहे.
मुंबई उपनगरात ग्राहकांना मिळणार या दराने, प्रतिलिटर -
दूध - जुना दर - नवीन दर
गाय - ५१ - ५४
टोण्ड - ५० - ५२