Gokul Milk Election : तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात : धनंजय महाडीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:31 IST2021-04-17T18:30:00+5:302021-04-17T18:31:43+5:30
Gokul Milk Election Kolhapur : प्रकाशराव चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत तुमच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे, त्यासाठी आपण ह्यगोकुळह्णचे नेते महादेवराव महाडीक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे आग्रहपूर्वक शिष्टाई करू, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार धनंजय महाडीक यांनी दिली.

चन्नेकुप्पी (ता.गडहिंग्लज)येथे आयोजित मेळाव्यात माजी खासदार धनंजय महाडीक यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्रकाश चव्हाण, रमेश रिंगणे उपस्थित होते.
गडहिंग्लज : प्रकाशराव चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत तुमच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे, त्यासाठी आपण ह्यगोकुळह्णचे नेते महादेवराव महाडीक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे आग्रहपूर्वक शिष्टाई करू, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार धनंजय महाडीक यांनी दिली.
चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथे गडहिंग्लज कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण गटाच्या गोकुळ ठराव धारकांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबूराव मदकरी होते. चव्हाण म्हणाले, महाडीक यांनी शब्द दिल्यामुळेच ठराव धारकांच्या पाठिंब्यावर आपण उमेदवारी दाखल केली आहे. गडहिंग्लजमधून आपल्यासह सदानंद हत्तरकी यांनाही उमेदवारी मिळावी.
यावेळी गडहिंग्लज कारखान्याचे संचालक किरण पाटील, माजी संचालक अॅड. सुभाष शिंदे,रमेश आरबोळे व आबासाहेब देसाई,भाजपचे गडहिंग्लज शहराध्यक्ष राजेंद्र तारळे,माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, अॅड. सुभाष डोंगरे, सदाशिव पाटील, रामू भनगे, अनुुप पाटील, भिमगोंडा पाटील, , प्रितम कापसे, रवींद्र शेंडुरे, सतीश शिरूर, विजय फुटाणे आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले.