महागाईचा आगडोंब!, ‘गोकुळ’च्या दूध विक्री दरात चार रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 07:48 PM2022-04-15T19:48:51+5:302022-04-15T19:55:53+5:30

उद्यापासून वाढीव दराने ग्राहकांना दूध खरेदी करावे लागणार आहे.

Gokul milk sale price increased by Rs 4 | महागाईचा आगडोंब!, ‘गोकुळ’च्या दूध विक्री दरात चार रुपयांची वाढ

महागाईचा आगडोंब!, ‘गोकुळ’च्या दूध विक्री दरात चार रुपयांची वाढ

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ केली आहे. आज, शनिवार पासून वाढीव दराने ग्राहकांना दूध खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कोल्हापुरात प्रतिलिटर ५८ रुपये तर पुणे व मुंबईत प्रतिलिटर ६४ रुपयांनी दूध खरेदी करावे लागणार आहे.

गोकुळ’ने पंधरा दिवसापुर्वी दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. साधारणता खरेदी बरोबर विक्री दरात वाढ होते, मात्र संघाने केवळ खरेदी दरात वाढ केल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पकाळच ठरला, संघाने खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करत असताना मात्र विक्री दरात चार रुपयांची वाढ करुन ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे.

आधीच महागाईने जनता हैराण झाली आहे. इंधन दरवाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने नागरिकांचे बजेट पुर्णता कोलमडून गेले आहे. यातच आता दूध दरातही वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

Web Title: Gokul milk sale price increased by Rs 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.