गोकुळच्या अधिकाऱ्यांनी हातात-हात घालून काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:18 AM2021-07-04T04:18:00+5:302021-07-04T04:18:00+5:30

गडहिंग्लज चिलिंग सेंटरला भेट, बैठकीत सूचना गडहिंग्लज : २० लाख लिटर्स दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकारी व सुपरवायझर ...

Gokul officials should work hand in hand | गोकुळच्या अधिकाऱ्यांनी हातात-हात घालून काम करावे

गोकुळच्या अधिकाऱ्यांनी हातात-हात घालून काम करावे

Next

गडहिंग्लज चिलिंग सेंटरला भेट, बैठकीत सूचना

गडहिंग्लज : २० लाख लिटर्स दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकारी व सुपरवायझर यांनी हातात-हात घालून काम करावे, अशी सूचना 'गोकुळ'चे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले.

लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील 'गोकुळ'च्या चिलिंग सेंटरला नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांनी भेट दिली. यावेळी अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी यांच्यातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.

नवीद मुश्रीफ म्हणाले, अधिकाऱ्यांनी दूध उत्पादकांना महालक्ष्मी पशुखाद्याची माहिती द्यावी व जास्तीत जास्त पुरवठा करण्यासंदर्भात आवाहन करावे.

यावेळी सहायक व्यवस्थापक (संकलन) रवींद्र करंबळे, सहायक व्यवस्थापक (पशुसंवर्धन )

डॉ. अविनाश जोशी, सहायक व्यवस्थापक (डेअरी) विजय कदम, दूध संकलन अधिकारी पी. एस. पाटील, अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी उपस्थित होते.

-

---

फोटो ओळी-

लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील 'गोकुळ'च्या चिलिंग सेंटरमध्ये नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांचा शाखाप्रमुख विजय कदम यांच्याहस्ते सत्कार झाला.यावेळी रवींद्र करंबळे, अविनाश जोशी, संतराम कांबळे,पी. एल. पाटील, संजय सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Gokul officials should work hand in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.