Gokul Milk Election Kolhapur : गोकुळच्या आरक्षित गटात विरोधक आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:21 AM2021-05-04T11:21:49+5:302021-05-04T11:28:16+5:30
Gokul Milk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला आज, मंगळवारी होणार आहे. सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात होणार असून सकाळी अकरापर्यंत कल स्पष्ट हाेईल. क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने अंतिम चित्र दुपारी दोननंतरच स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला आज, मंगळवारी होणार आहे. सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात झाली असून सकाळी अकरापर्यंत पहिल्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. आरक्षित जागांचा मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विरोधी आघाडीच्या पाच ही जागा आघाडीवर आहेत
अंतिम चित्र दुपारी दोननंतरच स्पष्ट होणार आहे. मतमोजणीत पहिल्या फेरीत अंजना रेडेकर याना २२६, शोमिका महाडिक याना १९२, सरुडकर याना २०२ संत सुश्मिता राजेश पाटील याना २१८ मते मिळाली आहेत. आरक्षित जागांचा मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विरोधी आघाडीच्या पाच ही जागा आघाडीवर आहेत. महिला गटात सुस्मिता राजेश पाटील आणि अंजनाताई रेडेकर, ओबीसी गटात अमरसिंह पाटील,भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बयाजी शेळके, अनुसूचित जाती गटात डॉ. सुजित मिणचेकर आघाडीवर आहेत.