गोकुळ धावले दूध उत्पादकाच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:26+5:302021-07-23T04:16:26+5:30

कोल्हापूर : खेबवडे (ता. करवीर) येथील गोकुळचे दूध उत्पादक दिनकर बळवंत पाटील यांच्या घराची व गोठ्याची अतिवृष्टीमुळे ...

Gokul ran to the aid of the milk producer | गोकुळ धावले दूध उत्पादकाच्या मदतीला

गोकुळ धावले दूध उत्पादकाच्या मदतीला

googlenewsNext

कोल्हापूर : खेबवडे (ता. करवीर) येथील गोकुळचे दूध उत्पादक दिनकर बळवंत पाटील यांच्या घराची व गोठ्याची अतिवृष्टीमुळे गुरुवार पडझड झाली. यात तीन गाभण जनावरे गंभीर जखमी झाली. ही घटना कळताच गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी तातडीने धाव घेत जनावरांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

दिनकर पाटील हे गोकुळ संलग्‍न श्री पांडुरंग सहकारी दूध व्‍याव. संस्‍था.,मर्या. खेबवडे (ता. करवीर) संस्‍थेचे सभासद आहेत. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे त्याचे राहते घर व गाेठ्याची भिंत कोसळली. यात अंदाजे दोन ते तीन लाख रुपये इतके नुकसान झाले. अध्यक्ष पाटील यांनी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील यांच्यासमवेत तिथे जाऊन पाटील कुटुंबीयांना आधार दिला, तसेच चुये सेंटरशी संपर्क साधून त्तातडीने उपचार सुरू करण्याच्या सूचना केल्या. यावेळी दूध संघाशी संलग्न सर्व दूध उत्पादकांनी किसान विमा पॉलिसी उतरवावी, असे आवाहन केले.

फोटो: २२०७२०२१-कोल-गोकुळ

फोटो ओळ : खेबवडे येथील दिनकर पाटील यांच्‍या गोठ्याची व जनावराची पाहणी गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, संचालक शशिकांत पाटील, प्रकाश पाटील यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन केली. यावेळी उपसरपंच सुयोग वाडकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.

Web Title: Gokul ran to the aid of the milk producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.