गोकुळ निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ सर्वोच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 03:44 PM2021-03-21T15:44:40+5:302021-03-21T15:47:05+5:30

Gokul Milk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा वातावरणात सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित केल्या असताना केवळ गोकुळची निवडणूकच का घेतली जाते, ती स्थगित करावी, अशी मागणी सत्तारूढ गटाच्या वतीने न्यायालयात करण्यात आल्याचे समजते.

Gokul in the ruling Supreme Court for postponing the election | गोकुळ निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ सर्वोच्च न्यायालयात

गोकुळ निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ सर्वोच्च न्यायालयात

Next
ठळक मुद्दे कोरोनाचे वाढलेल्या रूग्णांचा मुद्दा न्यायालयाच्या भूमिकेकडे सहकार क्षेत्राच्या नजरा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा वातावरणात सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित केल्या असताना केवळ गोकुळची निवडणूकच का घेतली जाते, ती स्थगित करावी, अशी मागणी सत्तारूढ गटाच्या वतीने न्यायालयात करण्यात आल्याचे समजते.

ह्यगोकुळह्णच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. मात्र कोरोनामुळे सर्वच संस्थांच्या निवडणूका लांबणीवर टाकल्या आहेत. निवडणूका लांबलेल्या काळात सत्तारूढ गटात अंतर्गत धूसफुस वाढत गेली, याचा अंदाज नेत्यांना आल्याने कोरोनाचा आधार घेऊन निवडणूका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न राहिला. काही संचालकांनी तर निवडणूका आणखी वर्षभर पुढे जाव्यात यासाठी देवच पाण्यात घातले होते.

उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने प्रक्रिया सुरू झाली मात्र याविरोधातही सत्तारूढ गट न्यायालयात गेला. न्यायालयाने निवडणूका घेण्याचे आदेश दिले, त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूकही झाली. येत्या दोन दिवसात प्रत्येक्ष निवडणूकाचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. तोपर्यंत निवडणूकीला स्थगिती द्यावी,यासाठी सत्तारूढ गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यावर न्यायालय नेमके काय मत नोंदवते, याकडे सगळ्या सहकार क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.

सत्तारूढ गट निवडणूकीला घाबरतो का
गेली तीस-चाळीस वर्षे गोकुळवर एकहाती सत्ता असल्याने प्रत्येक पंचवार्षिक मध्ये सत्तारूढ गट केव्हाही सज्ज असायचा. मात्र संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच बचावात्मक भूमिका घेतली आहे. सत्ता राखताना मागील निवडणूकीत झालेली दमछाक, मल्टीस्टेट व नोकरभरतीमुळे संस्था प्रतिनिधींच्या मनात असलेला राग व त्यातच सत्तारूढ गटाला पडलेल्या खिंडार, या सगळ्यांमुळे सत्तारूढ गटाला आताच निवडणूका नको आहेत. त्यामुळे कोरोनाच्या आडून निवडणूका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संस्था प्रतिनिधींमध्ये चर्चा आहे.

Web Title: Gokul in the ruling Supreme Court for postponing the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.