‘गोकुळ’ सॅटेलाईट डेअरीचे उद्या उद्घाटन

By admin | Published: May 28, 2016 12:45 AM2016-05-28T00:45:11+5:302016-05-28T00:47:55+5:30

उदगावातील प्रकल्प : आधुनिकतेतील पुढचे पाऊल-विश्वास पाटील

Gokul Saturday inaugurated the Dairy Daily | ‘गोकुळ’ सॅटेलाईट डेअरीचे उद्या उद्घाटन

‘गोकुळ’ सॅटेलाईट डेअरीचे उद्या उद्घाटन

Next


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा(गोकुळ)च्या उदगांव ( शिरोळ) येथील सॅटेलाईट डेअरीचे उद्घाटन रविवारी (दि. २९) राज्याचे दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. आधुनिकतेच्या दृष्टीने ‘गोकुळ’ने आणखी पाऊल पुढे टाकल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून संघाने आतापर्यंत वाटचाल ठेवली असून मादी वासरू संगोपन योजना, बल्क मिल्क कुलर योजना, सुधारित वैरण विकास व सायलेज संकल्पना, चारा वीट, मायक्रो ट्रेनिंग सेंटर, आहार संतुलन कार्यक्रम, आधुनिक पशुरोग निदान प्रयोगशाळा आदी वैशिष्ट्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून दूध व्यवसाय बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शिरोळ येथे सॅटेलाईट डेअरीची उभारणी करून दुग्ध व्यवसायाला एक नवी दिशा दिलेली आहे. या ठिकाणी दुधाचे पाश्चरायझेशन तसेच होमोजिनायझेशनची सुविधा उपलब्ध करून प्रतिदिन ४० हजार लिटर्स दूध पॅकिंग व साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
सॅटेलाईट डेअरीचे उद्घाटन दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते, माजी आमदार महादेराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याचे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

दृष्टिक्षेपात
सॅटेलाईट डेअरी
प्रकल्पाचे ठिकाण - उदगाव (शिरोळ)
प्रकल्पाचा खर्च - २५ कोटी
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान - १२.५० कोटी
क्षमता - रोज ४० हजार लिटर दूध पॅकिंग व स्टोरेजची व्यवस्था
थेट विक्री - येथून थेट पुणे, मुंबई मार्केटमध्ये दूध विक्री.
फायदा - दूध संकलन, वितरण तसेच वाहतूक खर्चात बचत होणार.

Web Title: Gokul Saturday inaugurated the Dairy Daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.