राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण भूमी संपादन प्रक्रियेला गोकुळ शिरगाव ग्रामस्थांचा तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:24 AM2021-04-01T04:24:38+5:302021-04-01T04:24:38+5:30
यासंदर्भात गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांच्यासह मिळकतधारकांची बैठक झाली. या बैठकीत महामार्ग रूंदीकरणाला ...
यासंदर्भात गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांच्यासह मिळकतधारकांची बैठक झाली. या बैठकीत महामार्ग रूंदीकरणाला विरोध न करता प्रस्तावित भूमी संपादन प्रक्रिया याचा फेरविचार करण्याबाबत एकमत झाले. त्याप्रमाणे सुदर्शन पेट्रोल पंपापासून एम.आय.डी.सी.फाट्यापर्यंत हायवेचा ओव्हरब्रीज करण्यासंदर्भात मागणी करण्याचे एकमताने ठरले. यासाठी अतिरिक्त भूसंपादनाची गरज नसल्याचे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले.
ओवर ब्रिजमुळे हायवेची वाहतूक परस्पर वरून होईल त्यामुळे जल संपादन व्यापाऱ्यांचे नुकसान भूमिसंपादन व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही शिवाय शासनाची भूमी संपादनाची रक्कमही वाचेल.. तसे निवेदन राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय व भूमी संपादन अधिकारी सातारा यांना देण्याचे ठरले तसेच यासंदर्भात गावठाण बचाव कृती समिती स्थापन करून या समितीच्या अध्यक्षपदी लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील आणि कार्यवाह म्हणून नारायण पोवार यांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये भूमिसंपादन अधिकाऱ्यांनी योग्य प्रतिसाद न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचे ठरले. यावेळी संपादित मिळकतधारक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
गोकुळ शिरगाव येथे बैठकीत बोलताना सरपंच महादेव पाटील आदींसह ग्रामस्थ
बातमी सविस्तर ठळक घेणे.