कोरोनाबाबात गोकुळ शिरगावकर सतर्कच....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:11+5:302021-04-20T04:24:11+5:30
गोकुळ शिरगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी केली असली तरी गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील ग्रामस्थ आणि ...
गोकुळ शिरगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी केली असली तरी गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत मात्र सुरुवातीपासूनच कोरोनाबाबत दक्ष आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबरोबर ग्रामपंचायतीनेही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने किराणा दुकानदारांची बैठक घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. व्यापाऱ्यांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावेळेव्यतिरिक्त दुकान सुरू दिसल्याने संबंधित दुकानदाराला दंड आकारला जाणार आहे. किराणा दुकानदारांचे स्वॅबही घेण्यात येणार आहेत. तसा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सर्दी, ताप व खोकला असल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात औषध फवारणी करण्यात आली आहे. दरम्यान,
गोकुळ शिरगावच्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामपंचायतीच्या हॉलमध्येच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
फोटो : १९ गोकुळ शिरगाव फवारणी
गोकुळ शिरगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.