गोकुळ कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धयानसाठी आपुलकीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:24 AM2021-05-21T04:24:03+5:302021-05-21T04:24:03+5:30

कोल्हापूर : रस्त्यावर दिवसरात्र राबवणाऱ्या पोलीस, महापालिका कर्मचारी या कोविड योद्धांसाठी गुरुवारी गोकुळच्या ताराबाई पार्कातील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने ताक वाटप ...

Gokul staff's hand of affection for Kovid Yodhayan | गोकुळ कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धयानसाठी आपुलकीचा हात

गोकुळ कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धयानसाठी आपुलकीचा हात

Next

कोल्हापूर : रस्त्यावर दिवसरात्र राबवणाऱ्या पोलीस, महापालिका कर्मचारी या कोविड योद्धांसाठी गुरुवारी गोकुळच्या ताराबाई पार्कातील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने ताक वाटप करत आपुलकीचा हात दिला.

गोकुळ दूध संघाचे कर्मचारी देखील कोविड योद्धे आहेत. गेले दीड वर्ष अविरतपणे दूध उत्पादकांकडून दूध घेऊन ते मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठेमध्ये विनाव्यत्यय पोहोच करत आहेत, पण या कर्मचाऱ्यांनी आपल्याल्या होणाऱ्या कष्टाची जाणीव ठेवत रस्त्यावर अहोरात्र राबत असलेल्या पोलीस व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पोटात घास घातला.

अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व नियोजन झाले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक डॉ. यु. व्ही. मोगले, संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, डॉ. प्रकाश साळुंखे, अशोक पुणेकरल ताराबाई पार्क कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो: २००५२०२१-काेल-गोकुळ

फोटो ओळ: गोकुळ दूध संघातील कर्मचाऱ्यांनी कोविड योद्धयांना ताक वाटप करत त्यांच्या कार्याला सलाम केला.

Web Title: Gokul staff's hand of affection for Kovid Yodhayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.