‘गोकुळ’ ग्रामीण भागात दूध विक्री वाढवणार : रविंद्र आपटे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:25 PM2019-01-19T18:25:21+5:302019-01-19T18:30:28+5:30
कोल्हापूर शहराबरोबरच तालुक्यांच्या ठिकाणी ‘गोकुळ’ ने दूध विक्री एजन्सी नेमल्या असून आगामी काळात मोठ्या गावातही नेमणूक करून दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री वाढवणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी दिली.
कोल्हापूर : शहराबरोबरच तालुक्यांच्या ठिकाणी ‘गोकुळ’ ने दूध विक्री एजन्सी नेमल्या असून आगामी काळात मोठ्या गावातही नेमणूक करून दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री वाढवणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी दिली.
एकीकडे सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी न्यायालयीन लढा केला जातो, आणि ‘गोकुळ’च्या माध्यमातून सीमाभागातील बांधवांना महाराष्ट्राप्रमाणे सोयी सुविधा देताना त्याला विरोध का करता? असा सवालही आपटे यांनी केला.
आपटे यांची अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर शनिवारी त्यांनी ‘लोकमत’ शहर कार्यालयास भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपटे यांनी अभिवादन केले.
‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते आपटे यांचा सत्कार करण्यात आला.