गोकुळ मल्टिस्टेट होवू देणार नाही- चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:22 PM2019-04-20T12:22:30+5:302019-04-20T12:30:53+5:30

महाडिकांचा जीव ‘गोकुळ’मध्ये अडकला आहे. परंतू हा दूध संघ कोणत्याही परिस्थितीत मल्टिस्टेट होवू देणार नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीत दिले जाणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Gokul will not be able to multitize - Chandrakant Patil | गोकुळ मल्टिस्टेट होवू देणार नाही- चंद्रकांत पाटील

गोकुळ मल्टिस्टेट होवू देणार नाही- चंद्रकांत पाटील

googlenewsNext

कोल्हापूर : महाडिकांचा जीव ‘गोकुळ’मध्ये अडकला आहे. परंतू हा दूध संघ कोणत्याही परिस्थितीत मल्टिस्टेट होवू देणार नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीत दिले जाणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.
कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील रॅलीनंतर कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापुरात पालकमंत्री म्हणून मी अशा तिघांनी निधी देण्याचे ठरवले तरच निधी लावता येतो. असे असताना धनंजय महाडिक आपण निधी आणल्याचे श्रेय घेतातच कसे अशी विचारणा पाटील यांनी केली.

पवार, सुप्रिया यांची पुरेशी व्यवस्था लावलीय
दादा पाटील प्रचारात कुठे आहेत अशी विचारणा होतेय. मात्र मी शरद पवार आणि सुप्रिया यांची पुरेशी व्यवस्था लावून आलोय. आता या मतदारसंघातील शेवटचे मत दिले जाईपर्यंत मी येथे ठिय्या मारून बसणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे संजय मंडलिक येथून विजय होतील.
पहा व्हिडीओ : लोकमत डॉट कॉमवर

Web Title: Gokul will not be able to multitize - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.