गोकुळच्या यादीत ५० संस्था प्रतिनिधी मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 06:00 PM2021-02-16T18:00:25+5:302021-02-16T18:01:48+5:30
Gokul Milk Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी गोकुळ दूध संघ व सहायक निबंधक (दुग्ध) येथे प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी एक वर्षापूर्वी संस्था प्रतिनिधींच्या नावाची असल्याने कोरोनासह इतर आजाराने सुमारे ५० ठरावधारक मृत दिसत आहेत. हरकतीच्या पहिल्याच दिवशी तीन संस्थांनी आपले संस्था प्रतिनिधींचे नाव बदलून ठराव दाखल केले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी गोकुळ दूध संघ व सहायक निबंधक (दुग्ध) येथे प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी एक वर्षापूर्वी संस्था प्रतिनिधींच्या नावाची असल्याने कोरोनासह इतर आजाराने सुमारे ५० ठरावधारक मृत दिसत आहेत. हरकतीच्या पहिल्याच दिवशी तीन संस्थांनी आपले संस्था प्रतिनिधींचे नाव बदलून ठराव दाखल केले.
गोकुळ ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. दुबार ठरावांसह ३६५९ संस्था प्रतिनिधींचा यादीमध्ये समावेश आहे. प्रारूप यादीवर २४ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. या यादीत एक वर्षापूर्वी संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव आहेत.
वर्षभराच्या कालावधीत सुमारे पन्नास ठरावधारकांचे विविध कारणाने मृत्यू झाल्याचे दिसते. त्यामुळे पहिल्याच दिवशी तीन दूध संस्थांनी हरकत घेत मृत प्रतिनिधींची नावे वगळून दुसऱ्या प्रतिनिधींच्या नावाचा ठराव दाखल केला. यामध्ये अमृतमंथन इंगळी (ता. हातकणंगले), सोमेश्वर, खानापूर (आजरा) या संस्थांचा समावेश आहे.
दोन दूध संस्था उच्च न्यायालयात
गेल्यावर्षी ठराव दाखल करण्यासाठी दिलेल्या विहीत वेळेत श्रीकृष्ण-काळकुंद्री, विठ्ठल बिरदेव-पट्टणकोडोली, महालक्ष्मी-काळजवडे, छत्रपती शिवाजीराजे-भुयेवाडी व रेणुका-कुर्डू या पाच दूध संस्थांचे ठरावच आले नव्हते. यापैकी छत्रपती शिवाजीराजे व श्रीकृष्ण या संस्थांनी ठराव दाखल करून घेण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.
बिनविरोध होणाऱ्या संस्थांचे ठराव बदलणार
सहकार नियम १० (४) नुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाच्या अगोदर पाच दिवस ठरावधारकांचे नाव बदलता येते. पहिल्या टप्प्यात ८५ दूध संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत संचालक मंडळ बदलले तर ठराव बदलू शकतो. मात्र, दूध संस्थांच्या निवडणुकीचा कालावधी व ह्यगोकुळह्णची उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया पाहता, ज्या संस्था बिनविरोध होतील, त्यांनाच ठराव बदलता येऊ शकतो.