‘मल्टिस्टेट’चा ठराव न वाचताच मंजूर, ‘गोकुळ’ची सभा ३ मिनिटांत गुंडाळली : चप्पलफेक, तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 06:11 PM2018-09-30T18:11:50+5:302018-09-30T18:12:03+5:30

Gokul's meeting was held in 3 minutes: slippers, choppers | ‘मल्टिस्टेट’चा ठराव न वाचताच मंजूर, ‘गोकुळ’ची सभा ३ मिनिटांत गुंडाळली : चप्पलफेक, तोडफोड

‘मल्टिस्टेट’चा ठराव न वाचताच मंजूर, ‘गोकुळ’ची सभा ३ मिनिटांत गुंडाळली : चप्पलफेक, तोडफोड

Next

कोल्हापूर : गेली महिनाभर कोल्हापूर जिल्'ाचे राजकारण पार ढवळून काढलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सभा रविवारी प्रचंड तणावाखाली व गोंधळातच अवघ्या ३ मिनिटांत गुंडाळली. या सभेत मल्टिस्टेटचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचा दावा सत्तारुढ गटाने केला, तर बहुतांशी सभासदांच्या ठरावास विरोध होता; त्यामुळे ठराव मंजूर झाला नसल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे. हा ठराव न वाचताच सभेपुढे मांडण्यात आला. विरोधी गटाचे नेते थेट सभेत घुसल्याने जोरदार घोषणाबाजी आणि चप्पलफेक झाली. अंगावर धावून जाण्याचे प्रकार झाले. आमदार चंद्रदीप नरके, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी सभेत येऊन या ठरावास विरोध दर्शवला.

Web Title: Gokul's meeting was held in 3 minutes: slippers, choppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.