‘गोकूळ’च्या दूध विक्री दरवाढीचा निर्णय तूर्त लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:17 AM2021-07-04T04:17:45+5:302021-07-04T04:17:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’ दूध संघाच्या दूध विक्री दरातील वाढीचा निर्णय तूर्त लांबणीवर टाकला आहे. ‘वारणा’, ‘कृष्णा’, ...

Gokul's milk price hike decision postponed immediately | ‘गोकूळ’च्या दूध विक्री दरवाढीचा निर्णय तूर्त लांबणीवर

‘गोकूळ’च्या दूध विक्री दरवाढीचा निर्णय तूर्त लांबणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’ दूध संघाच्या दूध विक्री दरातील वाढीचा निर्णय तूर्त लांबणीवर टाकला आहे. ‘वारणा’, ‘कृष्णा’, ‘चितळे’ आदी दूध संघाशी चर्चा करून दरवाढीचा निर्णय घेण्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले. पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली वाढ पाहता प्रतिलिटर दोन रुपये वाढीसाठी बहुतांशी संचालक आग्रही राहिल्याचे समजते.

‘अमूल’ दूध संघाने दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘गोकूळ’च्या पातळीवर दरवाढीबाबत हालचाली सुरू झाल्या. यासाठी शनिवारी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. यामध्ये अमूलने केलेली दूध विक्री दरातील वाढ, दूध उत्पादकांना द्यावयाची दरवाढ याविषयावर सविस्तर चर्चा झाली.

पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने दूध वाहतूक व पशुखाद्य कच्चा मालाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दूध विक्री दरात वाढ करावी का? यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्यात सहकारी दूध संघाचे असोसिएशन असल्याने त्यांच्याशी चर्चा करून दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, असे काही संचालकांनी सूचना केली. या दूध संघांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे अधिकार अध्यक्ष विश्वास पाटील यांना देण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रा. किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, बाबासाहेब चौगले, एस. आर. पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर उपस्थित होते.

खरेदी दरवाढीवरही चर्चा

विक्री दरात वाढ करत असताना खरेदी दरातही थोडीफार वाढ देता येईल का? याचाही अभ्यास करण्याची सूचना संघाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

कोट-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन, पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ परिणाम वाढलेला वाहतूक खर्च या सर्व बाबींचा विचार करून दूध विक्री दरात वाढ करण्याबाबत संचालक मंडळात चर्चा झाली. इतर दूध संघांशी चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.

- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकूळ)

Web Title: Gokul's milk price hike decision postponed immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.