गोकुळचा मुंबईचा दूध पुरवठा सुरळित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 02:37 PM2019-08-05T14:37:37+5:302019-08-05T14:41:49+5:30

महापुराने कोल्हापूरला वेढा दिल्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सोमवारच्या संकलनावर मोठा परिणाम झाला. परंतू मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Gokul's Mumbai milk supply is smooth | गोकुळचा मुंबईचा दूध पुरवठा सुरळित

गोकुळचा मुंबईचा दूध पुरवठा सुरळित

Next
ठळक मुद्देगोकुळचा मुंबईचा दूध पुरवठा सुरळितसंघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांची ‘लोकमत’ला माहिती

कोल्हापूर : महापुराने कोल्हापूरला वेढा दिल्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सोमवारच्या संकलनावर मोठा परिणाम झाला. परंतू मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी ‘लोकमत’ला दिली.

गोकुळ संघ मुंबईला प्रतिदिन सुमारे ८० हून जास्त टँकरद्वारे ६.५० लाख लिटर दूधाचा पुरवठा करतो. पुण्यातही २ लाख लिटर दूध पुरविले जाते. पावसामुळे सोमवारी सकाळी ९० हजारांहून अधिक लिटर दूध संकलन झाले नाही. सायंकाळी सुमारे ७० हजार लिटर दूध संकलन होण्याची शक्यता नाही. परंतू तरीही मुंबई व पुणे बाजारपेठेतील दूध पुरवण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

पुराच्या पाण्याचा फटका ‘गोकुळ’च्या दूध संकलनावर झाला आहे. गगनबावडा, बाजार भोगाव परिसरात पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प झाल्याने संघापर्यंत दूध पोहोचू शकलेले नाही.

जिल्ह्यात गेले तीन-चार दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. ९८ बंधारे पाण्याखाली गेले आहेतच, त्याशिवाय अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.  राधानगरी, कडवी, कासारी, वारणा धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी वाढत आहे.

पुराच्या पाण्याचा फटका सर्वच घटकांना बसत असून, ‘गोकुळ’च्या दूध संकलनावरही त्याचा परिणाम झाला आहे. गगनबावडा, धामणी खोरा व बाजार भोगाव परिसरातून होणारी दुधाची वाहतूक ठप्प झाली आहे. बाजारभोगावजवळ कासारी नदीच्या पुराचे पाणी आल्याने त्यापुढील सर्व मार्ग बंद झाले आहेत. तर लोंघे येथे पाणी आल्याने गगनबावड्यासह तळकोकणाचा संपर्क तुटला आहे.

गगनबावड्यात बल्ककुलर असला, तरी तिथे तीन वेळचे संकलनच होऊ शकते; त्यामुळे दूध संकलन ठप्प झाले आहे. बुधवारी ‘गोकुळ’चे संकलन कमी झाल्याची माहिती संघ प्रशासनाने दिली.

 

 

Web Title: Gokul's Mumbai milk supply is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.