सांगलीच्या मयुर सिंहासनेला सुवर्ण
By admin | Published: December 29, 2014 11:13 PM2014-12-29T23:13:00+5:302014-12-29T23:46:55+5:30
अखिल भारतीय बीएसएनसल क्रीडा स्पर्धा
सांगली : सांगलीच्या मयुर सिंहासने याने ६२ किलो गटात २१० किलो वजन उचलून, धक्कादायक निकाल नोंदवत वेटलिफ्टींगमध्ये सुवर्णपदक पटकावले. पॉवरलिफ्टींगमध्ये मात्र तामिळनाडूने धडाकेबाज कामगिरी करत वर्चस्व मिळवले.
येथील दिग्वजय व्यायामशाळेत चौदाव्या अखिल भारतीय बीएसएनसल क्रीडा स्पर्धा स्पर्धा सुरू आहेत. १६ राज्यातून १५२ नामवंत खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन खा. संजय पाटील यांच्या हस्ते झाले. अमोल गायकवाड यांनी स्वागत केले.
स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असा अंतिम निकाल असा : वेटलिफ्टींग : ५६ किलो : भुवनेश्वर सिंग (जम्मू-काश्मिर), जय सिंग (उत्तर प्रदेश), दिलीप कोरी (मध्य प्रदेश). ६२ किलो : मयुर सिंहासने (महाराष्ट्र), एन. थिरूनावूकारासू (तामिळनाडू), विनोदकुमार चौधरी (दिल्ली). ६९ किलो : धर्मवीर सिंग (उत्तर प्रदेश), एम. तामिलारासन (तामिळनाडू), जी. आर. कुमार (आंध्रप्रदेश). ७७ किलो : पुनीत त्यागी (उत्तर प्रदेश), जी. जांगलाय (आंध्रप्रदेश), के. एन. राय (उत्तर प्रदेश). ८५ किलो : अजयदीप सारंग (छत्तीसगढ), एस. व्ही. नारायण (आंध्रप्रदेश), के. गुणशेखरन (तामिळनाडू). ९४ किलो : हारेंद्र चौधरी (उत्तर प्रदेश), देवेंद्र साईनी (मध्य प्रदेश), आर. टी. कार्तीकेयन (तामिळनाडू). १०५ किलो : सत्य प्रकाश (उत्तर प्रदेश), एम. मल्लेश (आंध्रप्रदेश), के. प्रभू (तामिळनाडू). १०५ किलोवरील : प्रेमकुमार (तामिळनाडू), संतोष माने (महाराष्ट्र), शरदप्रसाद तिवारी (मध्य प्रदेश). पॉवरलिफ्टींगमध्ये महाराष्ट्रास एकही पदक मिळवता आले नाही.