गुरुपुष्यामृतच्या योगावर सुवर्ण खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:52+5:302021-01-01T04:17:52+5:30

कोल्हापूर : चांगल्या-वाईट घटनांचा आरसा दाखवणाऱ्या सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर कोल्हापूरकरांनी सोने खरेदी केले. या वर्षातील हा ...

Gold purchase on Gurupushyamrit's yoga | गुरुपुष्यामृतच्या योगावर सुवर्ण खरेदी

गुरुपुष्यामृतच्या योगावर सुवर्ण खरेदी

Next

कोल्हापूर : चांगल्या-वाईट घटनांचा आरसा दाखवणाऱ्या सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर कोल्हापूरकरांनी सोने खरेदी केले. या वर्षातील हा शेवटचा योग होता शिवाय आता लग्नांचा धुमधडाका असल्याने ग्राहकांनी मंगळसुत्रापासून ते चोख सोन्यापर्यंतची खरेदी केली.

हिंदू पंचागांनुसार वर्षातील शुभ योग-मुहूर्त म्हणून गुरुपुष्यामृतला विशेष महत्व आहे. यादिवशी कोणतेही शुभकार्य केले जाते तसेच आवर्जून सोन्याची खरेदी केली जाते. गेले वर्षभर कोरोनाने घातलेल्या धुमाकुळानंतर दिवाळीपासून आता बाजारपेठेतील उलाढाल, नागरिकांचे आर्थिक गणित पून्हा जुळू लागले आहे. त्यामुळे पुन्हा ग्राहकांच्या हातात पैसे आल्याने क्रयशक्तीही वाढली आहे. सध्या सोन्याचे दर स्थिर असल्यानेही नागरिकांनी या गुंतवणुकीवर भर दिला आहे. त्यातच लॉकडाऊन काळात अनेक कुटुंबातील लहान -मोठे समारंभ, साखरपुडा, विवाह पुढे ढकलण्यात आल्याने सध्या लग्नाचे मुहूर्त सुरु आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून गुरुवारी ग्राहकांनी सोने-चांदीच्या अलंकारांची खरेदी करण्यासाठी सराफ पेढीवर तसेच गुजरीत गर्दी केली होती. ग्राहकांनी अलंकारांमध्ये टॉप्स, अंगठी, चोख सोने, मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या यांची खरेदी केल्याची माहिती महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल यांनी दिली.

-

सुचना : फोटो मिळाला की स्वतंत्र कोलडेस्कला पाठवते.

-

Web Title: Gold purchase on Gurupushyamrit's yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.