मिळालेल्या संधीचे सोने करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:50+5:302021-08-23T04:26:50+5:30
सोळांकूर : पंचायत समितीच्या सभापतीपदी काम करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करणार असून तालुक्याच्या विकासाला प्रामुख्याने ...
सोळांकूर : पंचायत समितीच्या सभापतीपदी काम करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करणार असून तालुक्याच्या विकासाला प्रामुख्याने प्राधान्य देणार तालुका दुर्गम व डोंगराळ असला तरी मिळालेल्या कालावधीत तालुक्याचा सर्व बाबतीत समतोल विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती राधानगरीच्या नूतन सभापती सोनाली पाटील यांनी केंद्र शाळा दूधगंगानगर, ता. राधानगरी येथे गरीब होतकरू मुलांना गणवेश वाटप कार्यक्रमात केले.
अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख संजय जागनुरे हे होते.
सभापती पुढे म्हणाल्या, गेली दोन वर्षे रखडलेल्या शिष्यवृत्ती, सत्कार समारंभ, शाळांची लाइट बिले आदी विषयांवर जि.प. सदस्य सविता चौगले यांना बरोबर घेऊन शाळांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जि.प. सदस्य सविता चौगले यांनी केंद्र शाळा दुधगंगानगरला स्वनिधीतून प्रिंटर देण्याचे आश्वासन दिले. केंद्र शाळेच्या वतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी संगीत विशारद (तबला) विजय सुतार, समाज भूषण पुरस्कार प्राप्त किरण कुमार पाटील, धनंजय रोटे, मनोज पवार, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी केंद्र शाळा मुख्याध्यापक रमेश पाटील, मुख्याध्यापक एम.बी. चौगले, माजी डे. सरपंच विनोद डवर शिवाजी चौगले, शिवाजी पाटील, केंद्रातील सर्व शाळांचे अध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रमेश पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सुरेश सुतार यांनी मानले.
फोटो कॅप्शन : दूधगंगानगर केंद्र शाळेमध्ये मुलांना गणवेश वाटप करताना सभापती सोनाली पाटील, जि. प. सदस्या सविता चौगले, संजय जागनुरे, शिवाजी पाटील, शिवाजी चौगले, एम.बी. चौगले व अन्य मान्यवर.