गांधीमैदानात टोलेबाजी

By admin | Published: July 27, 2014 12:50 AM2014-07-27T00:50:25+5:302014-07-27T00:50:25+5:30

रवी इंगवलेंचा तिकिट न मिळाल्यास वेगळ्या विचाराचा इशारा

Golfer | गांधीमैदानात टोलेबाजी

गांधीमैदानात टोलेबाजी

Next

कोल्हापूर : राजकारणात न बोलता काट्यानेच काटा काढावा लागतो. आपल्याला जर निवडणूक लढवायची, तर क ोणाला दुखवून चालणार नाही. कामाची धडाडी, संघटन याला संयमाची जोड हवी, असा उपदेशाचा डोस जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, शनिवारी नगरसेवक रविकिरण इंगवले यांना दिला. शिवाजी पेठेतील गांधी मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली.
या कार्यक्रमात रविकिरण इंगवले यांनी माजी आमदार मालोजीराजे यांचे नाव घेऊन, तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील व नगरसेवक सत्यजित कदम यांचे नाव न घेता कडवट टीका केली. गेल्या महापालिका निवडणुकीत मला उमेदवारी मिळू नये, यासाठी मालोजीराजे व त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांनी टोकाचा विरोध केला. आमदार महादेवराव महाडिक यांच्यामुळेच त्यावेळी तिकीट मिळू शकले. मालोजीराजे यांच्या कर्मामुळेच त्यांचा पराभव झाल्याचा टोला त्यांनी यावेळी हाणला.
आपण कोल्हापूर उत्तरमधून राष्ट्रवादी किंवा कॉँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. त्यामुळे मुश्रीफ व महाडिक यांनी आपल्याकडे लक्ष द्यावे. जर का मला तिकीट नाकारले, तर वेगळा विचार करावा लागेल. आमदार कोणाला करायचे व कोणाला पाडायचे एवढी ताकद आपली या मतदारसंघात आहे, असा इशारा इंगवले यांनी दिला.
याचा संदर्भ घेत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर उत्तरची जागा कॉँग्रेसकडे आहे. त्यामुळे स्वतंत्र लढायचे झाल्यास नक्कीच विचार केला जाऊ शकेल; परंतु इंगवलेंनी भाषणात नेत्यांवर केलेली टीका चुकीची आहे. विधानसभा निवडणूक लढवायची असेल, तर त्यांनी असे प्रसंग टाळावेत. निवडणुकीत सर्वांना बरोबर घेऊन गेले पाहिजे. असे सुनावले.
‘उत्तर’मध्ये उमेदवारांची गर्दी
कोल्हापूर शहरात सध्या इच्छुकांचे जिकडे-तिकडे डिजिटल फलक झळकत आहेत. तो-जो निवडणुकीसाठी इच्छुक आहे. त्यामुळे ‘कोल्हपूर उत्तर’च्या आमदारकीचा प्रश्न आता येथील जनताच सोडवू शकेल, असा टोला मुश्रीफ यांनी हाणला. संभाजी देवणे यांचेही फलक यात असल्याचे सांगून त्यांनी देवणे यांचीही खिल्ली उडविली. त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
धनंजय महाडिकांपुढे ‘धर्मसंकट’
विधानसभा निवडणुकीत मी कागलमध्ये असल्याने कोल्हापूर उत्तरमध्ये आपला काही जास्त संपर्क येणार नाही; परंतु धनंजय महाडिक हे खासदार असल्याने त्यांची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे. कारण लोकसभेत प्रत्येकाने केलेली मदत पाहता महाडिक यांना कुणाच्या मागे उभा राहायचे हे त्यांच्या पुढे धर्मसंकटच आहे, असे मुश्रीफ यांनी हसत-हसतच सांगितले.

Web Title: Golfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.